राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्काराचे धनराज शिंदे मानकरी

राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्काराचे धनराज शिंदे मानकरी

कुर्डुवाडी /राहुल धोका – नवभारत ग्रुपच्या राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्काराचे धनराज शिंदे हे ठरले मानकरी आहेत
नवभारत वृत्तपत्रसमुहाचा राज्यस्तरीय एज्युकेशन पुरस्कार ता. प. सदस्य तथा माढा वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांना वैधकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हास्ते स्विकारला आहे .३० ऑगस्ट सोमवार रोजी मुंबईतील विले पार्ले येथील ऑरचिड पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला

शेतकऱ्यासह गोरगरिब कुटुंबातील मुलींना शाळेत जाण्यासाठी माढा तालुक्यातील ८०० हून अधिक मोफत सायकलीचे वाटप करुन मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचे मोठं काम त्यांनी केले आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर देण्यात आला आहे.

दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कै .विठ्ठलराव शिंदे यांचा वारसा तर आमदार बबनराव शिंदे ,आमदार संजयमामा शिंदे , वडील उद्योजक रमेश (मालक) शिंदे यांच्या मार्गदर्शनात धनराज शिंदे यांची यशस्वी घौडदौड सुरु आहे.

माढा तालुका पंचायत समितीचे वयाच्या २१ वर्षीच सदस्य होण्याचा बहुमान त्यांनी राज्यात पटकावला. राजकारणाला समाजकारणाची जोड देत त्यांचे सुरु असलेले काम उल्लेखनीय असेच आहे. माढा वेल्फेअर फौंडेशन व विठ्ठ्ल गंगा प्राड्युसर कंपनीच्या माध्यमातून धनराज शिंदे यांची सर्व सामान्यांशी नाळ जोडली गेलेली आहे.

शेतकरी गोरगरिब कुटूबांतील मुलींना शाळेत जाण्यासाठी माढा तालुक्यातील ८०० हून अधिक मोफत सायकलीचे वाटप त्यांनी केले आहे.या कामी त्यांना सामाजिक संस्थांची मदत देखील लाभली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अशा ३७ किमी ओढ्याचे खोलीकरणाचे काम केले आहे.

कोविड महामारीच्या काळात देखील धनराज शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून २७ लाखांची वैद्यकिय साहित्याचे वाटप करीत मदतीचा हात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: