बेंगळुरूच्या पराभवाचा सर्वात मोठा दोषी ठरला हा दिग्गज; न धावा केल्या आणि बटलरचा झेलही सोडला


IPL 2022 Qualifier RCB vs RR: मुंबई : आयपीएल १५ च्या क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्यानंतर आरसीबी आता स्पर्धेबाहेर पडली आहे. या संघाला १५ वर्षांनंतरही पहिले विजेतेपद मिळवता आलेले नाही. या उलट, राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर राजस्थानने २०१८ मध्ये प्लेऑफ खेळले, पण तब्ब्ल १४ वर्षानंतर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. राजस्थानच्या या ‘रॉयल’ प्रवासात स्टार सलामीवीर जोस बटलरने निर्णायक भूमिका बजावली आहे. तसेच आरसीबीविरुद्ध जोस बटलरने आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत शानदार शतक झळकावले.

वाचा – …तर जोस बटलरचे शतक होऊच शकले नसते, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात घडली होती मोठी चूक

बटलरचा झेल सोडला
आरसीबीच्या एका खेळाडूने अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी जोस बटलरचा झेल सोडला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक आहे. राजस्थानच्या डावात हर्षल पटेलने ११ वे षटक टाकले. इथे स्पर्धा चालू होती पण, त्यानंतर कार्तिकने विकेटच्या मागे एक सोपा झेल सोडला. त्यावेळी कार्तिकने बटलरचा झेल घेतला असता तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळाच लागला असता. हा झेल चुकल्यानंतर बटलरनेही शानदार शतक झळकावले.

वाचा – जोस बटलर राजस्थानसाठी ठरला हुकमी एक्का, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम

फलंदाजीतही फ्लॉप
दिनेश कार्तिकने या संपूर्ण हंगामात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या मॅच-विनिंग फलंदाजीच्या जोरावर त्याने आरसीबीसाठी अनेक सामने जिंकले. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात दिनेश पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात कार्तिक केवळ ७ धावाच करू शकला. आरसीबीची मधली फळी घडगडली, ज्यामुळे संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत मारू शकला नाही. या एका करणामुळेही सामन्यात बेंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

वाचा – टी-२०मध्ये झाले वादळी शतक; तुम्ही बटलरची फलंदाजी विसरून जाल

राजस्थानचा दणदणीत विजय
राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला आणि २९ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. विशेषतः जोस बटलरने शानदार शतक झळकावले, जे या मोसमातील त्याचे चौथे शतक ठरले. बटलरच्या जोरावर राजस्थानला फायनलचे तिकीट मिळाले. तसेच गोलंदाजांनीही महत्वपूर्ण कामगिरी करत बेंगळुरूला अवघ्या १५८ धावसंख्येत रोखले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: