‘छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं’; जितेंद्र आव्हाडही बोलले


डोंबिवली : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी शिवसेनेवर केलेला आरोपानंतर शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) संभाजीराजेंच्या भूमिकेवर व्यक्त केलेल्या परखड मतानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील या प्रकरणी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं, अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. (jitendra awhad gives reaction over what chhatrapati shahu maharaj said)

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यापूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शाहू महाराज हे मोठ्या विचारांचे आहेत. शाहू महाराजांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे हे आमचे भाग्य असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. तर आव्हाड यांनीही छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

क्लिक करा आणि वाचा- छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेचे शिवधनुष्य चालले नाही हे आमचे दुर्दैव; राऊत

आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो : जितेंद्र आव्हाड

आर्यन खान यांची काल निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे म्हटले आहे. एखाद्याच्या बालमनावर चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या घरच्या मुलाकडे बघून आपण विचार केला पाहिजे. ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे. या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही. त्यामुळे उपरवाला सब देखता हैं, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- मामा-भाचा डोंगरावर ट्रेकिंगची हौस महागात, अडकलेल्या चौघा मुलांची अखेर सुटका

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या आठ वर्षांत असे एकही काम केलेले नाही, की ज्यामुळे लोकांचे डोके शरमेने खाली जाईल असे विधान केले होते. यावर मंत्री आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे खरे आहे की मोदींनी कोणतेही असे काम केले नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल, किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने असे काम केलेले नाही, सत्तर वर्षाच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असेच काम प्रत्येक पंतप्रधानाने केले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे आव्हाड म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, वाद सोडवणाऱ्या मध्यस्थाचा मारहाणीत मृत्यूSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: