वाहनाधारकांनो लक्ष द्या; ३१ मे रोजी पेट्रोल पंपांवर होईल खडखडाट कारण…


मुंबई : राज्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या ३१ मे २०२२ रोजी पेट्रोल पंपचालकांनी डिलर कमिशन वाढवून देण्यासाठी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी इंधन खरेदी न करण्याच्या निर्णयाने राज्यातील पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांना त्यापूर्वीच इंधन टाकी फूल करावी लागणार आहे.

सर्व्हिस चार्ज हा आमचा हक्क! हॉटेल व्यावसायिकांची चर्चेची तयारी
पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क आणि इतर करांचा वाद सुरु असतानाच आता यामध्ये पंप चालकांनी उडी घेतली आहे. २०१७ पासून कंपन्यांनी डिलर कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. मागील काही वर्षांपासून पंप चालकांनी डिलर कमिशन वाढवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कंपन्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पेट्रोल डिलर्सने इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाईने गृहस्वप्नाला तडा! देशातील बड्या सिमेंट उत्पादक कंपनीची भरमसाठ दरवाढ
दरम्यान, इंधन खरेदी न करण्याच्या या अनोख्या आंदोलनाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा पेट्रोल पंप डिलर असोसिएशनने केला आहे. केवळ डिलर कमिशन वाढवणे ही एकच मागणी नाही तर केंद्र सरकारने अचानक शुल्क कपात केल्याने पेट्रोल पंप चालकांना आर्थिक नुकसान सोसांव लागले. त्याची भरपाई मिळावी ही देखील मागणी आहे. या आंदोलनातून इंधन वितरक कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पेट्रोल डिलर असोसिएशनचे रवी शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पुढील आठवड्यात ‘पीएम किसान’चा लाभ, अशी तपासा यादी
हे आंदोलन देशभरात होणार आहे. त्यामुळे ३१ मे रोजी पेट्रोल डिलर कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाहीत. परिणामी महामार्गांवर, निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या पंपावर इंधनाचा साठा संपण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: