चर्चमध्ये भेटवस्तूंचं वाटप, मोठी गर्दी जमली, गेट तुटल्यानं चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू


लागोस : नायजेरियात चर्च मध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. या घटनेत ७ जण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सीएनएननं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. नायजेरियातील दक्षिणेकडील शहर पोर्ट हारकोर्टमध्ये ही घटना घडली.
‘चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं कळलं’, कोल्हापूरला जाऊन राऊतांनी डिवचलं
अन्नाची पाकिटे घेण्यासाठी शेकडो लोकांनी चर्चबाहेर गर्दी केली होती. त्यावेळी चर्चचं गेट तुटलं आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला.

ही घटना पोर्ट हारकोर्टमधील लोकल पोलो क्लबजवळ घढली. किंग्ज असेंम्ब्ली चर्चच्या वतीनं भेटवस्तू दान मोहीम सुरु करण्यात आली होती, अशी माहिती नायजेरिया सिव्हील डिफेन्स कॉर्पसचे ऑलूफेमी अयोडेले यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता ३१ मे रोजी जारी होणार
भेटवस्तू दान कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांच्या प्रवक्त्यांनी भेटवस्तू दान मोहीम सुरु होताच चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं. भेटवस्तू वाटपाच्या ठिकाणी दाखल होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. चर्चमध्ये जाण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आणि गेट तुटल्यानं चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला.

संभाजीराजेंना शिवसेनेचे शिवधनुष्य चालले नाही हे आमचे दुर्दैव; राऊत
स्थानिक पोलिसांचे प्रवक्ते वोयेंगिकुरो लरिंगे कोको यांनी ३१ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तर, ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

‘अभिनंदन’ नाम ही काफी है, तीन वर्षाच्या चिमुरड्याची हुशारी तर पाहा, भारताची माहिती त्याला तोंडपाठSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: