सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग; ८ ते ९ सिलेंडरचे स्फोट
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अशर आयटी पार्क शेजारी असलेल्या अंबिका नगर, प्लॉट नंबर ए – २०२ येथील सिलिका सायंटिफिक या कंपनीला शनिवारी रात्री साडे १० वाजण्याच्या सुमारास आग अचानक आग लागली. या कंपनीत प्रयोगशाळेतील सामान तयार केले जाते. या आगीने हळूहळू रौद्ररूप धारण केले. या कंपनीत एलपीजी गॅसचे सिलेंडरचा साठा असल्यामुळे जवळपास ८ ते ९ सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण कर्मचारी, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलिस दल, ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळी अग्निशमन दलाचे ६ ते ७ अग्निबंब, २ फायर वाहन, १ रेस्क्यू वाहन, २ पाण्याचे टँकरसह १ रुग्णवाहिका पोहचून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं’; जितेंद्र आव्हाडही बोलले
सध्या अग्निशमन दलाकडून या कंपनीच्या कुलिंगचे काम सुरू आहे. सावधानता बाळगण्याची महावितरण कडून परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. मात्र कंपनीत लागलेली भीषण आग आणि सिलेंडरचा ब्लास्ट मुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
क्लिक करा आणि वाचा- छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेचे शिवधनुष्य चालले नाही हे आमचे दुर्दैव; राऊत
कोणतीही जीवितहानी नाही
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून कंपनी मात्र जाळून खाक झाली आहे. ही आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जवळपासच्या कंपन्यामधून कर्मचाऱ्यांना बाहेर काढत परिसर रिकामा केला. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रथमदर्शनी ही आग शॉक सर्किट मुळे लागली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे.
क्लिक करा आणि वाचा- मामा-भाचा डोंगरावर ट्रेकिंगची हौस महागात, अडकलेल्या चौघा मुलांची अखेर सुटका