IPL फायनलमध्ये हे दिग्गज स्वबळावर बदलू शकतात सामन्याचा निकाल; संपूर्ण स्पर्धेत गाजवलय वर्चस्व


IPL Final 2022: आयपीएलचा १५ वा हंगाम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. चालू हंगामात १० संघ सहभागी झाले होते. मात्र अखेर जेतेपदासाठी आता दोन संघ मैदानात उरले आहेत. लीग टप्पा संपल्यानंतर गुजरात टायटन्स १० सामन्यात २० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले, तर राजस्थान रॉयल्स ९ सामने जिंकून १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि आता हे दोन संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी हे दोघेही प्लेऑफ सामन्यात आमनेसामने आले होते, ज्यामध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

वाचा – IPL 2022 Final: IPLला नवा चॅम्पियन मिळणार की राजस्थान पूर्ण करेल शेन वॉर्नचे स्वप्न

प्रत्येक हंगामाप्रमाणे या वेळीही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीने संघांच्या आयपीएल फायनलपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीने सामना संघात मोलाचे योगदान दिले आहे. आता आयपीएल 2022 ची अंतिम फेरी काही तासांवर असताना अशा चार खेळाडूंवर नजर टाकूया ज्यांच्याकडून अंतिम सामन्यात विजयी कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते.

जोस बटलर
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरचे नाव या यादीत अग्रस्थानी आहे. सध्याच्या मोसमात इंग्लंड फलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये चार शतके झळकावली आहेत आणि एका मोसमात सर्वाधिक शतके करण्याच्या कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बटलरने १६ सामन्यांत १५१ च्या स्ट्राईक रेटने ८२४ धावा केल्या आहेत. बटलरने प्ले ऑफमध्येच १९५ धावा केल्या आहेत.

वाचा – IPL चे फायनलिस्ट होणार मालामाल, जाणून घ्या कोणत्या टीमला मिळणार किती रककम

युझवेंद्र चहल
फिरकीपटू युझवेंद्र चहलचा राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात मोठा वाटा आहे. चालू हंगामात १६ सामन्यात २६ विकेट्स घेऊन सर्वाधिक बळी घेणारा हसरंगा नंतरचा तो दुसरा गोलंदाज आहे. प्ले ऑफमध्ये चहलची जादू चालली नाही आणि या काळात तो एकही विकेट घेऊ शकला नाही व तो महागडाही ठरला आहे. पण लीग टप्प्यात त्याने आपली भूमिका चोख बजावली.

हार्दिक पंड्या
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने कर्णधार म्हणून कहर केला आहे. त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे, परंतु या स्पर्धेत त्याने ज्या प्रकारे मोठ्या कर्णधारांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे ते विलक्षण आहे. हार्दिकने १४ सामन्यात ४५.३० च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत पांड्याने २६.३ षटकात ५ बळी घेतले आहेत.

वाचा – आई आजारी आहे, पण…; राजस्थानच्या या पट्ठ्याने हिंमत हारली नाही, रॉयल चॅलेंजर्सचं कंबरडं मोडलं

राशिद खान
गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज राशिद खानने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. राशिद खानने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. त्याला एका सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली, जिथे त्याने आपल्या फलंदाजीने गुजरातला विजय मिळवून दिला. १५ सामन्यांत १८ विकेट घेत तो गुजरातचा दुसरा आघाडीचा फलंदाज आहे. राशिदनेही या मोसमात ९१ धावा केल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: