मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रातही आनंदवार्ता; पुढच्या चार दिवसांत…
मोठी बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती
हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनीदेखील केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. उद्यापासून पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.आज सकाळी आठ वाजता केरळ राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं सध्या आकाश अंशतः ढगाळ असेल, असंही त्यांनी म्हटलं होतं.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन कसे जाहीर केले जाते?
१० मेनंतर केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर दुसऱ्या दिवशी मान्सूनचे केरळमधील आगमन जाहीर केले जाते. पण, त्यासोबत हवामानाचे इतरही काही घटक गृहीत धरले जातात.
वाचाः मान्सूनची प्रगती का संथावली, काय आहेत कारणं? पाहा…
दरम्यान, मान्सूनने या वर्षी सर्वसाधारण वेळेआधीच अंदमान-निकोबार आणि दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला होता. मात्र, सर्वसाधारण वेळेआधी प्रवास सुरू केलेल्या मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास संथावला असल्याचे दिसून येत आहे.