प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर एका माथेफिरूकडून हल्ला

पंढरपूर – काल दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.


त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दि 31/08/2021 रोजी राज्यभर आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती च्यावतीने संपूर्ण कामकाज कडकडीतरित्या बंद करण्यात येत आहे व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी आज नगरपरिषद समोर 11 वाजता गेट मिटिंग घेऊन निषेध नोंदवतील व काम बंद करतील अशी माहिती सुनिल वाळुजकर ,जनरल सेक्रेटरी,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती यांनी दिली आहे.

शासकीय कर्मचार्यांवर वारंवार हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. यात महसूल विभागाचे तसेच पोलीस कर्मचारी अधिक आहेत. यात आप आपसातील काही गोष्टी कारणीभूत असल्या तरी अनेक कर्मचारी विनाकारण भरडले जात आहेत.वास्तविक गुंडगिरी करुन कोणतेही प्रश्न मार्गी लागणार नाहीत. यात काही जबाबदार व्यक्तींची वागणूक, भाषाही कारण ठरत आहे. याला लगाम लावणे गरजेचे असून सर्वसामान्यांनी मनावर घेणे आवश्यक आहे. मतदान करताना पैसे घेऊन मत देण्यापेक्षा त्या व्यक्तीची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: