पडद्यामागील कामगिरी करणारे वामनराव भोसले काळाच्या पडद्याआड

पडद्यामागील कामगिरी करणारे वामनराव भोसले काळाच्या पडद्याआड Behind the scenes performance of Wamanrao Bhosale

मुंबई,दि.२७ – १९६० ते १९९० या ३ दशकांच्या काळात वामनराव भोसले यांनी संकलक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरशः राज्य केले होते. आपल्या पडद्यामागील कामगिरीने त्यांनी अनेक चित्रपटांना वेगळ्या उंचीवर पोहोचविले होते. नेटक्या संकलानातून चित्रपट खुलावणाऱ्या ज्येष्ठ संकलकास आपण मुकलो आहोत , अशी शोकसंवेदना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

२०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांच्या कारकीर्दीचा गौरव करण्यात आला होता. पडद्यामागील या महान कलाकारास माझी भावपूर्ण आदरांजली , असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: