लायन्स क्लबचे काम कौतुकास्पद – आमदार प्रशांत परिचारक

लायन्स क्लबचे काम कौतुकास्पद – आमदार प्रशांत परिचारक The work of the Lions Club is commendable – MLA Prashant Paricharak

लायन्स क्लब पंढरपूर च्यावतीने चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्धाटन
  पंढरपूर - लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क या प्रकल्पाचे उद्धाटन विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लायन्स संस्थेचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे, रघुकुल सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

ईंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, लायन्स क्लब पंढरपूर व मनिप्पूरम फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 हा लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क रघुकुल हौसिंग सोसायटीतील ओपन स्पेसमधे 3000 स्क्वेअर फुट जागेत तयार करण्यात आले असुन या पार्कमधे विविध प्रकारच्या १४ खेळण्यांचा समावेश करण्यात आला असुन लायन्स संस्थे मार्फत मजबूत व चांगल्या प्रतीची खेळणी बसवण्यात आली. सदर उपक्रमास पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला.

   लायन्स सदस्य आर्किटेक्ट सतीश शेटे यांनी सदर प्रोजेक्टमध्ये विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा तसेच जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधुन पंढरपूरातील प्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख यांचाही सन्मान करण्यात आला. 

   या कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारक यांनी लायन्स संस्थेचे केलेल्या विशेष उपक्रमाचे कौतुक केले व लहान मुलांचा सर्वांगीण विकास या पार्कच्या माध्यमातून होईल व मुलांना मैदानी खेळाची आवड लागेल असे सांगितले . 

 नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सांगितले की लायन्स संस्था गरजुसाठी विविध उपक्रम राबवत असून आजचा हा लहान मुलांसाठीचा कायमस्वरूपी व उपयुक्त उपक्रम लायन्स संस्थेने राबवला असल्याबद्दल लायन्स क्लबचे अभिनंदन केले. 

 लायन्स अध्यक्ष माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की, कोरोनाने आपणास दाखवून दिले कि शरीर संपत्ती हि सर्वोत्कृष्ट संपत्ती असते.सदर पार्कमुळे लहान मुलांना मैदानी विविध खेळ खेळण्याची आवड लागेल . संघर्ष करण्याची सवय लहान वयातच होईल आणि मोबाईल पासुन त्यांची सुटका होईल. पुढील वर्षी दुसऱ्या ठिकाणी आणखी एक Chilrden Park बनवण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. 

  डॉ.सुजाता गुंडेवार यांनी सांगितले की सर्व लायन्स सदस्यांच्या मदतीने आमचे चिल्ड्रन पार्क चे स्वप्न आज पुर्ण होत असल्याने खुप आनंद वाटत आहे. 

  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रेयी केसकर यांनी केले . रा.पा.कटेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, गटनेते गुरुदास अभ्यंकर, नवनाथ रानगट, आदित्य फत्तेपुरकर, नारायन सिंघन,ललिता कोळवले,डॉ. मृणाल गांधी, माजी अध्यक्ष डॉ.पल्लवी माने, डॉ.ऋजुता उत्पात,आरती बसवंती, सुरेखा कुलकर्णी, लता गुंडेवार, उर्मिला गुंडेवार, सरिता गुप्ता, शोभा गुप्ता, सीमा गुप्ता, प्रतिक्षा येलपले, माधुरी गायकवाड,माधुरी जाधव, ज्योती कटेकर,सरोज लाड,डॉ.अजित गुंडेवार,राजेंद्र शिंदे, अतुल कौलवार, मंदार केसकर, कैलास करंडे, ओंकार बसवंती, गिरीश पाटील, लायन सदस्य व रघुकुल सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: