श्री नामदेव महाराज पायरीचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शुध्दीकरण

श्री नामदेव महाराज पायरीचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शुध्दीकरण Purification of Shri Namdev Maharaj Payari by Congress workers

   पंढरपूर,01/09/2021 - वारकरी संप्रदायात विठोबा माऊलीनंतर संत नामदेव महाराज सहकुटुंब समाधी पवित्र मानले जाते. पुर्वी त्या स्थळाला नमस्कार करून पाय न लागू देता मंदिरात प्रवेश करायचे, अशा पवित्र स्थानांमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांनी चपला व बूट घालून कठडे ओलांडुन धुडगूस घातला.मीडियावर झळकण्यासाठी या कार्यकर्त्यांनी संत नामदेव महाराज पायरीवर चपला बूटासहित भान विसरून, ज्या ठिकाणी विठोबा रुक्मिणी व नामदेव तुकारामांच्या नावाचा जयघोष घुमतो, अशा ठिकाणी वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याच्या ऐवजी भाजप चिन्ह असलेले झेंडे घेऊन घोषणा देत धुडगुस घातला व श्री विठ्ठल मंदीराच्या प्रवेशद्वारावर झेंडे फडकले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व नामदेव पायरी पवित्र स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या व वारकरी संप्रदायाच्या सर्व भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे . 

      यासाठी आज काॅग्रेस पक्षाकडून श्री संत नामदेव महाराज पायरी आणि मंदीर परिसरात पंचामृताने व गोमुत्राने शुधीकरण करण्यात आले. भाजप पक्षाच्या अध्यक्षांनी आणि आमदारांनी जाहीर माफी मागावी अन्यथा सोलापूर ओबीसी विभाग व सर्व काँग्रेस कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील असा इशारा काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. 

  यावेळी सोलापूर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष काँग्रेस समीर कोळी,युवक जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, जिल्हा सरचिटणीस हणमंत मोरे, अल्पसंख्यक शहराध्यक्ष अशपाक सय्यद, युवक कार्याध्यक्ष सागर कदम, मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,शहर सरचिटणीस मिलिंद अढवळकर, बाळासाहेब आसबे, भाऊ तेलंग आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: