सोलापूर येथे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली दखल

प्रभाग 4 येथील कुंभारवेस ते कोंत्तम चौक येथील व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली दखल

 सोलापूर,01/09/2021-येथील कुंभारवेस ते कोंत्तम चौक भागातील व्यापाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून अर्धवट रस्त्याच्या कामामुळे त्रास होत होता.सतत वाहतूक कोंडी होत होती आणि पावसामुळे पाणी साठत होते चिखलामुळे वाहने घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे  येथील व्यापाऱ्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना तक्रार देताच त्यांनी स्वतः महानगरपालिका व स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

    याप्रसंगी नगरसेवक अमर पुदाले, विनायक विटकर, राजकुमार पाटील, राजकुमार काकडे, उत्तर पश्चिम मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, उत्तर-पश्चिम मंडळ सरचिटणीस शिवराज राजकुमार पवार, राहुल मेहेरवाडे, सचिन पवार, गणेश भूमकर, दशरथ शालगर, दीपक रंगरेज, संजू श्रीगिरी, नितेश पवार, कुमार मिरजकर आदी व्यापारी व मान्यवर उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: