सिध्दार्थ शुक्ला यांच्या निधानने हिंदी सिनेसृष्टीची हानी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
सिध्दार्थ शुक्ला यांच्या निधानने हिंदी सिनेसृष्टीची हानी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Siddharth Shukla’s demise is a loss to Hindi cinema – Union Minister of State Ramdas Athawale
दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांच्या अंत्यविधिस केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले उपस्थित राहुन वाहिली आदरांजली
मुंबई,दि.03/09/2021 - बिगबॉस सिझन 13 चे विजेते लोकप्रिय युवा कलाकार सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधानने हिंदी सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांच्या अंत्यविधिस जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत ना.रामदास आठवले उपस्थित राहिले.दिवंगत सिद्धार्थ शुक्ला यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन ना.आठवले यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत सिद्धार्थ शुक्ला यांच्या शोकाकुल कुटुंबियांची ना रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
दिवंगत सिद्धार्थ शुक्ला यांना रिपब्लिकन पक्षातर्फे तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली.
मजबूत देहयष्टीचा सुंदर आणि लोकप्रिय सिद्धार्थ शुक्ला भविष्यात हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार झाला असता. त्यांच्या स्मृती चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहतील अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.