अत्याधुनिक माती पाणी आणि देठ परिक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन

अत्याधुनिक माती पाणी आणि देठ परिक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन Groundbreaking of state-of-the-art soil water and stalk testing laboratory

कुर्डूवाडी/राहुल धोका,03/09/2021-दहिवली- निमगाव (टे)च्या शिवेवर साकारत आहे माढा वेल्फेअर फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांचा संयुक्त प्रकल्प .दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी दहिवली व निमगाव (टे) माढा वेल्फेअर फाउंडेशन च्यावतीने व फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्याने अत्याधुनिक माती पाणी व पूर्ण देठ परीक्षण प्रयोगशाळेचा भूमिपूजन शुभारंभ होत आहे. या प्रयोगशाळेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे दोन कोटी इतका खर्च अपेक्षित असून त्यापैकी सुमारे एक कोटी वीस लाख रुपये मुकुल माधव फाउंडेशन,फिनोलेक्स इंडस्ट्रीज च्या माध्यमातून सीएसआर निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे वेल्फेअर फाउंडेशनचा पूर्वीचा प्रकल्प बेंद ओढा खोलीकरण रुंदीकरण यासाठीही मुकुल माधव फाउंडेशन ने सुमारे पन्नास लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिलेला होता. त्या खोलीकरण रुंदीकरण प्रकल्पामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा झालेला असून गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमध्येही पूर नियंत्रणासाठीही त्या ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामाचा थेट परिणाम तेथील शेतकरी आणि नागरिक यांना जाणवलेला होता.

माढा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी येथील पीक पद्धती आणि पीक उत्पादन वाढीच्या पद्धती यासाठी आवश्यक बाबींमध्ये प्रयोगशाळेचा विशेष उल्लेख माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी करून विविध सीएसआर फंडिंग हाऊसेस यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करूनच खताच्या मात्रा दिल्यास खर्चिक पिक उत्पादन पद्धतीला फाटा देणे सहज शक्य आहे हे भागातील कष्टाळू होतकरु युवक आणि प्रगतिशील शेतकरी यांची नेहमीची मागणी होती. या मागणीला अनुसरून फाऊंडेशनचे सीएसआर एक्झिक्युटिव्ह महेश डोके आणि तांत्रिक प्रमुख युवराज शिंदे यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवलेला होता.

 याविषयी सतत तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर यामध्ये मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांनी या प्रस्तावाचा स्वीकार करून त्याला मंजुरी दिली आहे. या प्रयोगशाळेचा शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीतील बाबींवर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
धनराज शिंदे , अध्यक्ष माढा वेलफेअर फाउंडेशन

दिवसेंदिवस खतांच्या औषधाच्या वाढीव किमतीमुळे शेती उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे शेती आर्थिक तोट्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल यासाठी प्रिसिजन फार्मिंग कडे जावे लागेल . त्या दृष्टिकोनातून ही अत्याधुनिक प्रयोगशाळा माती पाणी आणि डेट परीक्षणाचे काम करेल आणि त्यामधून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करेल. अंतिम ध्येय शेतकऱ्यांचा नफा वाढवणे हेच आहे –

धनराज शिंदे
अध्यक्ष माढा वेलफेअर फाउंडेशन

रितू छाब्रिया, संचालिका, मुकुल माधव फाउंडेशन

सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे समाजाचे कर्तव्य आहे शेतकरी सुखी तर जग सुखी हा भारतामधील सर्वमान्य विषय आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यासाठी ही प्रयोगशाळा कार्यरत राहील, या उद्देशानेच माढा वेल्फेअर फाउंडेशनला निधी उपलब्ध करून दिलेला आहे –

  • रितू छाब्रिया, संचालिका,
    मुकुल माधव फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: