युवक काॅग्रेसकडून मिठाई वाटुन देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा

युवक काॅग्रेसकडून मिठाई वाटुन देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा Youth Congress celebrates birthday of former Home Minister Sushilkumar Shinde by distributing sweets

   पंढरपूर, ०४/०९/२०२१ -देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडून चंद्रभागा वाळवंटामध्ये मिठाई व फळे वाटुन साजरा कण्यात आला. सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


     या कार्यक्रमामध्ये काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ उराडे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिठाई व फळे वाटप करण्यात आले.


      यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.राजेश भादुले,युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास भाळवणकर, मिलिंद अढवळकर, दत्तात्रय बडवे, गणेश लखेरी, प्रवीण येवणकर,सुभाष गायकवाड, सागर जाधव, पिंटू मेटकरी, सौरव भादुले, संग्राम करंजकर, शैलेश डोंगरे,महेश बुचके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: