न्यायालयाने ज्योतिषशास्त्राची सत्यता अधोरेखित केली असतांना त्याला कोण विरोध करू शकतो ?

न्यायालयाने ज्योतिषशास्त्राची सत्यता अधोरेखित केली असतांना त्याला कोण विरोध करू शकतो ?
Who can oppose the fact that the court has underlined the truth of astrology ?

मुंबई ,०४/०९/२०२१- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात (इग्नू) ज्योतिषशास्त्रविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करण्याला काही तथाकथित पुरोगामी आणि नास्तिक मंडळींकडून होणार्‍या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर 4 सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून राज्यपालांनी ‘‘ज्योतिषशास्त्र हे केवळ शास्त्र नसून विज्ञान आहे. ते जगभरात शिकवले जाते. न्यायालयाने ज्योतिषशास्त्राची सत्यता अधोरेखित केली असतांना त्याला कोण विरोध करू शकतो ? तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा, मी पहातो’’, असे आश्‍वासन देत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रम शिकवण्याला पाठिंबा दर्शवला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, मुंबई समन्वयक बळवंत पाठक, गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे आणि श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भोसले हे उपस्थित होते.

     सर्वोच्च न्यायालयाने ज्योतिषाशस्त्राच्या विरोधातील दावा फेटाळतांना ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, अशी टिपण्णी दिली आहे. या संदर्भातील निवेदन रमेश शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले आणि याविषयीची सविस्तर माहितीही दिली. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’त ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवण्याची विनंती या वेळी समितीच्या वतीने राज्यपालांना करण्यात आली. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

   श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राशी विसंगत असलेल्या कृत्रिम हौदांना प्रोत्साहन देणे बंद करून शासनाने शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे, तसेच हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, याविषयीची निवेदने राज्यपालांना देण्यात आली.
कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घालून शाडूच्या मूर्तीला प्रोत्साहन द्यावे
     पर्यावरणपूरक असल्याचा गाजावाजा करून कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता; मात्र त्या कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदूषणकारी असल्याने त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष 2016 मध्ये बंदी घातली होती. तसेच दिनांक 3 मे 2011 च्या शासन निर्णयावर स्थगिती आणली होती. तरीही बाजारात कागदी लगद्याच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणीही राज्यपालांकडे केली. यामध्ये लक्ष घालण्याचे आश्‍वासन राज्यपालांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: