मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने राजु शेट्टींसोबत बोलावली बैठक

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाची दखल घेत तातडीने राजु शेट्टींसोबत बोलावली बैठक Taking note of the agitation, Chief Minister Uddhav Thackeray immediately called a meeting with Raju Shetty

कुरूंदवाड येथे सोलापूर जिल्ह्याचेवतीने माजी खासदार राजू शेट्टी यांचा पांडुरंगाची तुळशीमाळ व वारकरी बुक्का लावून केला सत्कार
  कोल्हापूर /प्रतिनिधी, ०५/०९/२०२१ - माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा नृसिंहवाडीत पोहोचली आहे . शेतकर्‍यांच्या आणि पूरग्रस्तांच्या प्रश्‍नांसाठी नृसिंहवाडीत पंचगंगेत उडी मारून जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला होता .सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीत पोचले होते.या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सौरभ शेट्टी  यांनी सांगितले की सरकारने पूरग्रस्तांबाबत आत्तापर्यंत निर्णय घेणे आवश्यक होते. पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हे सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे . संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाच दिवसां पासून पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू केली होती. वेळोवेळी आंदोलने पण केली मात्र सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तयार नाही.मात्र आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आंदोलनाची दखल घेत उद्या तातडीने राजु शेट्टींसोबत बैठक घेण्याचे ठरवले आहे आणि तसे निमंत्रण त्यांनी राजु शेट्टी यांना दिले आहे. राजु शेट्टी यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी ही आमची राज्य सरकारला विनंती असणार आहे. उद्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा निघेल आणि ठोस निर्णय होईल असा विश्वास आहे. कारण तोंडी आश्वासनांवर आमचा विश्वास राहिलेला नाही.

     माजी खासदार राजु शेट्टी यांच्या पुरग्रस्त आक्रोश पदयात्रेत सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,युवा आघाडीचे प्रदेश प्रवक्ता रणजित बागल,जिल्हा संघटक शाहजहान शेख,बाहुबली सावळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, नानासाहेब चव्हाण, यशवंत बागल,माळशिरस तालुकाध्यक्ष अजीत बोरकर,धुळदेव लोखंडे, आहिल पठाण, समाधान काळे,विजय वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुरूंदवाड येथे सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांचा पांडुरंगाची तुळशीमाळ व वारकरी बुक्का लावून सत्कार करण्यात आला.  

   पदयात्रा समारोप नृसिंहपुर येथे आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी  उपस्थिती दर्शवली.

राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चास शेतकर्यांची प्रचंड उपस्थिती होती.आलेला हा प्रचंड जनसमुदाय हा राजु शेट्टी साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा होता अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,युवा आघाडीचे प्रदेश प्रवक्ता रणजित बागल,जिल्हा संघटक शाहजहान शेख, बाहुबली सावळे यांनी व्यक्त केली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: