तिसरा डोळा :
तिसरा डोळा :
डोळ्यांसमोर असावं पण डोळ्यांवर येऊ नये !!
चिंतन करावं पण चित्त विचलित करु नये !!
स्पर्धा असावी पण द्वेष करु नये !!
दया करावी वा मागावी पण दुबळ असू नये !!
स्तुती असावी पण स्तूत्य असावी !
स्वाभिमान अभिमान असावा पण अहंकार नसावा !!.
आत्मविश्वास असावा पण अतिरेक नसावा !!
सतर्क असावं पण संथ नसावं!!
उक्ति प्रमाणे कृती असावी
पण नुसती वाचाळता नसावी !!
संयम असावा पण शरणार्थी नसावं !!
शिक्षण असावं पण आळशी नसावं !!
गावरान चिमटा:
जेंव्हा अहंकाराने स्वतःच्या मनावरील ताबा सुटतो तेंव्हा स्वतःच्याच जिभेवरचा तोल ढासळतो अन
स्वतःच्या अस्तित्वाला सुरुंग लागतो
कारण नसतांना जो तो
आपल्याच करणीने तुरुंगवास भोगतो .”!!
"सुप्रभात"
” कोणत्याही भोंदूगिरीचा पुरस्कार करणारा कोणीही असो,कितीही मोठा असो तोही भोंदूच ठरतो “
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००
