सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार : रिपाइं (आठवले) राज्य संघटन सचिव सुनिल सर्वगोड

सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव सुनिल सर्वगोड यांची घोषणा All local bodies will contest elections on their own: Ripai (Athawale) State Union Secretary Sunil Sarvgod

पंढरपूर, ०६/०९/२०२१ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित  करण्यात आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करून पक्षाचे राज्य संघटन सचिव सुनिल सर्वागोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे काम करू असे आश्वासन दिले.

 याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे  राज्य संघटन सचिव सुनिल सर्वगोड यांनी आपले पक्षाचे नेते ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आपण काम केले पाहिजे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यास कार्यकर्त्यांनी तयार राहावे. पक्षाच्या वाढीसाठी विधायक कामातून समाजातील विविध लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत त्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी आपणास आवश्यक ती मदत करू असे संबोधित केले. 

 यावेळी सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर, मोहोळ या ठिकाणाहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानुसार ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरात एका  स्वतंत्र महामेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

      या बैठकीत रिक्त असलेल्या पंढरपूर शहर सरचिटणीसपदी प्रशांत लोंढे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्षपदी रणजित कांबळे, पंढरपूर युवक शहराध्यक्षपदी विशाल मांदळे यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांनी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी सार्वमताचा आढावा घेतला आणि सर्वांनी पक्षहितासाठी मला साथ द्यावी असे आवाहन केले.

 या बैठकीचे आयोजन पंढरपूर शहर व तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.या बैठकीस राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुरज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड.किर्तीपाल सर्वगोड, पश्चीम महा सचिव नागनाथ ओहोळ, पश्चीम महा संघटक दयानंद धाइंजे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण बनसोडे, सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बिडबाग, सोलापूर युवक शहराध्यक्ष लखन चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सावंत, भारत आठवले,शामराव भोसले,पश्चीम महा उपाध्यक्ष राजाभाऊ भोसले, युवक आघाडीचे नेते आकाश जगताप, युवक नेते दत्ताभाऊ नाईकनवरे, युवक नेते अमर लोखंडे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रविण माने, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रविराज बनसोडे, पंढरपूर शहराध्यक्ष अरविंद कांबळे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष रामभाऊ गायकवाड, मोहोळ तालुकाध्यक्ष गौतम क्षिरसागर, माढा तालुकाध्यक्ष अमर बडेकर, माळशिरस तालुकाध्यक्ष धनाजी पावर, सांगोला तालुकाध्यक्ष दिपक ओहाळ आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर युवक तालुका कार्याध्यक्ष नितीन गायकवाड यांनी केले . कार्यक्रमाचे आभार पंढरपूर शहराध्यक्ष अरविंद कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: