कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी सर्व मदत करणार – आ.संजयमामा शिंदे

कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी सर्व मदत करणार – आ.संजयमामा शिंदे All will help to stop the third wave of Corona – MLA Sanjay Mama Shinde

निमाचा पुरस्कार वितरण सोहळा

     कुर्डूवाडी / राहुल धोका,०५/०९/२०२१ - कोरोना काळात डॉक्टरांनी भरपूर काम केले आहे .अजून ही तिसरी लाट येणार असे सांगितले जात आहे. ती येवू नये यासाठी काम करणे गरजेचे आहे . पूर्वीपासून सर्वाना सहकार्य केले आहे, यापुढे ही संपूर्ण मदत करणार असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी निमाच्या पुरस्कार कार्यक्रमात केले. 

कुर्डूवाडी शहरातील कोरोनासाठी काम करणारे प्रशासकीय अधिकारी,वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर ,आशा वर्कर,मेडीकल स्टाफ यांचा सेवा गौरव पुरस्कार देवून कोविड योद्धा सन्मान निमा संघटनेकडून करण्यात आला.आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र ,स्मृती चिन्ह ,शाल देवून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     कै.विठ्ठलराव शिंदे सभागृहात झालेल्या या समारंभात आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.आशिष शहा, डॉ संतोष कुलकर्णी,डॉ नवजीवन शहा,डॉ.जयंत करंदीकर,निमाचे अध्यक्ष डॉ.विश्वेश्वर माने यांची प्रमुख उपस्थित होती.

   आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या सहकार्याबदल आ.संजयमामा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर डॉ सचिन गोडसे यांनी धन्वन्तरी स्तवन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हर्षद शहा यांनी केले.

सत्कार मूर्ती प्रांताधिकारी ज्योती कदम,पंचायत समिती सभापती डॉ संताजी पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी थोरात, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ.सुनंदा रणदिवे, तहसीदार राजेंद्र चव्हाण, डॉ.मारुती फडके, पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे , नगरपालिका आरोग्य अधिकारी तुकराम पायगण, डॉ सुरेश व्यवहारे ,डॉ.चंद्रशेखर साखरे ,डॉ लकी दोशी, डॉ रविंद्र देवकते , डॉ रोहित बोबडे , डॉ सोमनाथ गायकवाड,डॉ.सचिन गोडसे ,डॉ.विवेकानंद पाटील ,डॉ.प्रसन्न शहा, डॉ प्रदुम्न सातव,डॉ.शुभम खाडे,डॉ.सागर पाटील,डॉ.शुभांगी शिंदे,डॉ.गिरीश गव्हाणे, डॉ.स्वाती विधागज, डॉ.मारवल खाडे, गणेश गव्हाणे,परिवर्तन बाभूळकर,शहाजी पाटील , कोरोना रुग्णाल्यातील काम करणारा स्टाफ चा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. 

  यावेळी डॉ प्रशांत नलवडे डॉ.मयूर वाघमोडे, डॉ हेमंत काळे, डॉ संतोष दळवी,डॉ.संतोष सुर्वे , दादासाहेब शेंडगे, डॉ.चंद्रशेखर क्षीरसागर, अनिल वायकुळे, डॉ कलीम कोरबू, डॉ सुशील खान्द्विक्र डॉ विजय पाटील, हरिदास बोराडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: