आपत्कालीन परिस्थिती निवारणाच्या क्षेत्रात शिक्षकांचे बहुमोल योगदान

योग विद्या धाम,लायन्स क्लब पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ यांच्यावतीने शिक्षक दिन साजरा Teacher’s Day celebrated by Yoga Vidya Dham,Lions Club Pandharpur and Savarkar Premi Mandal

आपत्कालीन परिस्थिती निवारणाच्या क्षेत्रात शिक्षकांचे बहुमोल योगदान

 पंढरपूर ,०५/०९/२०२१ : सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व समाज अनेक संकटांचा सामना करत असताना शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व शिक्षक वृंदांनी जे अतुलनीय योगदान दिले आहे ते अमूल्य आहे अशी भावना लायन्स क्लब व योग विद्या धाम पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडल यांच्या ऑनलाइन व ऑफलाईन पध्दतीने आयोजित शिक्षक दिनामध्ये अशोक ननवरे सर व विवेक परदेशी यांनी सावरकर क्रांती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

 या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचे प्रतिनिधी दिपक ईरकल, डॉ.सचिन लादे, विनोद शेंडगे संगीत शिक्षक, उमेश तारापूरकर, योग शिक्षक अशोक ननवरे, श्रीमती ललिता कोळवले, सौ स्वाती जोशी, सौ मैत्रीयी केसकर, सौ अपर्णा बनवस्कर, मंजुषा कुलकर्णी, ज्योती उत्पात,गिरीश भिडे, सुनील यारगट्टीकर,माधव कुलकर्णी, मंजिरी देशपांडे, हेमलता यारगट्टीकर, अमरजा कुलकर्णी, अभय आराध्ये, आशा क्षिरसागर तसेच जलनेती अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सौ निता जामदार व कृष्णा जामदार गुजराथी, संगीता ननवरे, सुचिता ननवरे, सौ स्वाती ननवरे व मयुरी नवनरे यांचाही सन्मान करण्यात आला.

   याप्रसंगी बोलताना दीपक ईरकल यांनी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता सर्व शिक्षक कार्यरत आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला. लायन्स क्लब आणि योग विद्या धाम यांनी या कार्याची नोंद घेऊन शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानले. 

  श्रीमती ललिता कोळवले , सौ स्वाती जोशी, विनोद शेंडगे ,उमेश तारापूरकर ,डॉ.सचिन लादे यांनी शिक्षक स्वतःच ज्ञान आणि अनुभवाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतो त्याची जाणीव समाजाला आहे व बहुतांशी शिक्षक हे अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत याची नोंद या दोन मोठ्या संस्थांनी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

   लायन्स क्लबचे अध्यक्ष नगरसेवक विवेक परदेशी यांनी आम्हाला आर्दश शिक्षकांचा सन्मान करायची संधी मिळाली त्यामुळे आम्ही भाग्यशाली असल्याचे सांगितले. 

 योग विद्या धाम चे प्राचार्य अशोक ननवरे सर यांनी सर्व साधकांच्या साह्याने जलनेती सारखे राबवलेले विविध उपक्रम कोरोना पासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरले याबद्दल समाधान व्यक्त केले.

    याप्रसंगी लायन्स क्लब च्या उपाध्यक्षा सौ मृणाल गांधी, ओंकार बसवंती, योगसाधक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग विद्या धामचे साधक किशोर ननवरे, विठ्ठल केसकर ,आर.एस. कुलकर्णी ,श्री कटप यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अश्विनी आराध्ये यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ मैत्रेयी केसकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमरजा कुलकर्णी यांनी केले. आभार सौ विजया नाईक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: