क्रिकेट कसोटीत भारतीय संघाचा विजय आणि लसीकरणातल्या कामगिरीविषयी पंतप्रधानांनी केले कौतुक
क्रिकेट कसोटीत भारतीय संघाचा विजय आणि लसीकरणातल्या कामगिरीविषयी पंतप्रधानांनी केले कौतुक The Prime Minister lauded Indian team’s victory in cricket Test and its performance in vaccination
नवी दिल्ली,6 सप्टेंबर 2021/PIB Mumbai – लसीकरण मोहिमेत आणखी एकदा महत्वाचा टप्पा साध्य केल्याबद्दल तसेच क्रिकेट कसोटीतल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
आज पुन्हा एकदा आपण एक कोटी लसींच्या मात्रा दिल्या,गेल्या 11 दिवसांत तिसऱ्यांदा भारताने ही कामगिरी केली आहे.
क्रिकेटमध्ये देखील आज भारताने ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
सबको व्हँक्सिन मुफ्त व्हँक्सिन ” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
“(पुन्हा एकदा) भारतात, लसीकरण मोहिमेसाठी महत्वाचा दिवस आणि क्रिकेटच्या मैदानावरही ! नेहमीप्रमाणेच # टीम इंडियाचा विजय!