अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी – विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

वानवडी पोलीस स्टेशन मधील दि०६ सप्टेंबर, २०२१ रोजी नोंद झालेल्या FIR क्र ३०३/२०२१ मधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी – विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
  पुणे ,०६/०९/२०२१ - पुणे शहरात दि ३१ ऑगस्ट २०२१ च्या रात्री एक अल्पवयीन मुलीला रिक्षा चालकाने फसवून एका निर्जन ठिकाणी नेले. व तिथे ८ पेक्षा जास्त व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केला आहे. याबाबत वानवडी पोलीस स्टेशन मध्ये दि.०६ सप्टेंबर,२०२१ रोजी FIR क्र ३०३/२०२१ ने गुन्हा नोंद झाला आहे. या गंभीर प्रकरणामध्ये विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुढील निर्देश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे यांना दिले आहेत 

तपास व्यवस्थित करावा,CCTV फुटेज मिळवून आरोपी पकडावेत,आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे असा तपास करावा , महिला तपास अधिकारी नेमावा,अत्याचारित मुलीला मानसोपचार तज्ज्ञांची व्यवस्था करावी व तिचे समुपदेशन करावे,तिला तात्काळ मनोधैर्य योजनेतून मदत करावी.

   या घटनेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारा विरोधात सहा रिक्षावाले व दोन रेल्वे कर्मचारीही सामील होते हे घृणास्पद व निंदनीय आहे. त्याचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकारी श्रीमती नम्रता पाटील आणि श्री लगड यांच्याशी माझी तपशीलवार संवाद झालेला आहे.या घटनेवरून एक चित्र स्पष्ट दिसते आहे की, या मुलीला घेरून समाजकंटकांनी सामूहिक तिच्यावर अत्याचार केलेले आहे. तिची तब्येत सुधारते आहे व त्याच्या कुटुंबियांशी पण मी बोलत आहे. पण त्याच बरोबर लक्षात घ्यायला हवे की पुणे रेल्वे स्टेशन, ससून हॉस्पिटल, पुणे एसटी स्टँड या परिसरामध्ये रात्री बरेचसे आणि निष्पाप महिला, मुली तिथे गाडी पकडण्यासाठी आलेले असतात अशा वेळेला त्यांना दिशाभूल करून त्यांचावर झडप घालणारे अतिशय विघातक प्रवृत्तीचे लोक आहेत. म्हणून समाजातल्या काही उपयोगी काम करणार्‍या लोकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी संरक्षणासाठी म्हणून काम करावे, जेणेकरून त्यांना मदतीची सेवा करू शकेल. अशा प्रकारचे काम  करताना स्त्री आधार केंद्राच्या मदतीने पुणे पोलिसांनी एका वर्षामध्ये 100 मुलींचा जीव वाचवला आहे आणि म्हणून अशा प्रतिबंधात्मक कामाची गरज आहे त्याच्याबद्दलच्या सूचना पुणे शहर पोलिस आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी सुद्धा रेल्वे, बस आणि आसपासच्या स्थानिक पोलिस यांनी समन्वय आणि महिला सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबवावेत अशी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे त्यांना सूचना दिली आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असून आरोपींना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महिला व तरूणींना अत्यंत असुरक्षित वाटत आहे हे घडणार्‍या घटनांवरुन दिसत आहे. नेमका कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: