राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमारी संघामध्ये कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या प्रिती काळे हिची निवड
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमारी संघामध्ये कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या कु.प्रिती अशोक काळे हिची निवड Preeti Ashok Kale of Kalyanrao Kale Sports Club selected in Maharashtra’s Kumari Sangha for National Competition
शेवगाव - अहमदनगर येथे दि. ५,६ ,७ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्यस्तरीय कुमार - कुमारी निवड चाचणी खो खो स्पर्धेमध्ये सोलापूर संघाची कर्णधार कु.प्रिती काळे हिची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. या स्पर्धेमध्ये सोलापूर कुमारी संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाच्या सहाय्याने कुमारी संघास राज्यात ५ वा.क्रमांक मिळाला.
सोलापूर जिल्हा अॕम्युचर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर , सहकार शिरोमणी वसंंतराव काळे स.सा.कारखान्याचे चेअरमन व K K SPORT’S चे कल्याणराव काळे , महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे पंचमंडळ अध्यक्ष श्रीकांत ढेपे,सोलापूर जिल्हा अॕम्युचर खो-खो असोशिएशन सचिव सुनिल चव्हाण , खजिनदार श्रीरंग बनसोडे सर , कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष समाधान काळे , कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या मार्गदर्शिका व श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. संगिताताई काळे , संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरूजी , प्राचार्य दादासाहेब खरात सर ,पर्यवेक्षक सत्यवान काळे सर , वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु. प्रिती अशोक काळे हिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कु.प्रिती अशोक काळे या खेळाडूंस वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली चे क्रीडाशिक्षक व क्लबचे सचिव प्रशिक्षक प्रा. संंतोष पाटील सर व क्लबचे संचालक व प्रशिक्षक अतुल जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.