बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर

बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहिर Election of various office bearers of Baliraja Shetkari Sanghatana announced

  पंढरपूर / नागेश आदापूरे - बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,सोलापूर महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. जयश्रीताई बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करण्यात आल्या . 

 बळीराजा शेतकरी संघटनेचे नूतन पदाधिकारी सौ.सुरेखाताई पाटील महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र युवाआघाडी अध्यक्षपदी तसेच विभागीय जिल्हाध्यक्ष (माढा, करमाळा,बार्शी)भागासाठी नूतन विभागीय जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे आणि बार्शी तालुकाध्यक्षपदी संतोष बोरा यांच्या निवडी करण्यात आला.

     यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, सोलापूर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जयश्रीताई बोरा, जिल्हा संघटक तानाजी सोनवले, मंगळवेढा तालुका अध्यक्ष दामाजी मोरे, पंढरपूर युवा अध्यक्ष औदुंबर सुतार, युवानेते मनोज बागल,माढा अध्यक्ष रामेश्वर लोंढे, अक्षय ढवळे, सुरज ढवळे, ऋषिकेश खडके, निखील खराडे, विजय खराडे, श्रीराम महाडिक, संजय बोरा, विकास खराडे आदी उपस्थित होते .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: