पंढरपूर शहरातील सर्व हातगाडीवर फिरून विक्री करणारे भाजीपाला,फळ व इतर विक्रेते यांना आवाहन Appeal to all vendors selling vegetables,fruits and other handcarts in Pandharpur city

पंढरपूर – पंढरपूर शहरातील सर्व हातगाडीवर फिरून विक्री करणारे भाजीपाला,फळ व इतर विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की, सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा covid-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिलेल्या निर्देशानुसार पंढरपूर शहरातील सर्व भाजीपाला फळ व इतर हातगाडीवर फिरून विक्री करणारे विक्रेते यांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे .

तरी सर्व हातगाडी विक्रेते यांनी दि 28,29,30 एप्रिल 2021 या दिवशी उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) व नगरपरिषदचा जुना सरकारी दवाखाना (जुनी पेठ) येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत आपली कोरोना तपासणी करून घ्यावी. आपली तपासणी केलेले सर्टिफिकेट हातगाड्यावर ठेवणे बंधनकारक आहे.

  1 मे 2021 या तारखेनंतर तपासणी केलेले सर्टिफिकेट हातगाडीवर नसल्याचे निदर्शनास आल्यास हातगाडीसह माल जप्त करण्यात येईल व आपणावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायदामधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी सर्व हातगाडी विक्रते यांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , नगरपरिषद पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

  सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत बाजारात जत्रा भरलेली असते. ना विक्रेत्यांनी मास्क लावलेला असतो ना ग्राहकांने.कोणालाही कोरोना बाबत गांभीर्य कळलेले दिसत नाही.आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाने मुसंडी मारली असून त्यामुळे अनेकांचा बळी घेतला आहे. सोशल डिस्टनसिंगही कोणी पाळत नाहीत. अनेक कोरोना बाधित आणि त्यांचे संपर्कातील बिनधास्त गावभर फिरत आहेत. व्यवसाय करत आहेत. वास्तविक नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित असून सर्व सूचनांचे योग्य पालन करण्याचे आवाहन नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *