घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी

घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी Guardian Minister Rajesh Tope inspects farmers affected by heavy rains in Ghansawangi taluka

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

  जालना / जिमाका :-  -  सोमवारी जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत घनसावंगी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेत शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

    या पहाणी प्रसंगी जि.प.चे उपाध्यक्ष महेंद्र पवार,भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे,उत्तमराव पवार बाळासाहेब जाधव,रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे,नकुल भालेकर,अमरसिंह खरात, सुदामराव मुकणे, ताराचंद देवले, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर.शिंदे,उप अभियंता श्री निरवळ, गट विकास अधिकारी श्री जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले,जालना जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात  शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर ऊस पीक आडवे झाल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच काही ठिकाणी रस्ते, पुल तसेच जनावरांचेही नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे 10 हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रीमंडळासमोर ठेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी सांगितले.

मंगरूळ येथील नुकसानीची ट्रॅक्टरमध्ये बसून जात पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी

 घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फूटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले असून याची पहाणी करण्यासाठी त्या ठिकाणी कुठलेच वाहन जात नसल्याने पालकमंत्री  श्री टोपे यांनी ट्रक्टरमध्ये बसुन जात नुकसानीची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी तीर्थपुरी, बानेगाव,बानेगाव फाटा,सौंदलगाव,शेवता, भोगगाव, मंगरूळ आदी ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: