विकास योजना राबवितांना कोकण विभाग राज्यात अग्रेसर – विभागीय आयुक्त विलास पाटील
विकास योजना राबवितांना कोकण विभाग राज्यात अग्रेसर – विभागीय आयुक्त विलास पाटील Konkan Division is leading in implementing development plan in the state – Divisional Commissioner Vilas Patil
महा आवास अभियान-ग्रामीण पारितोषिक वितरण
नवी मुंबई :- लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले.
महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना आज कोकण भवन येथे "महा आवास अभियान-ग्रामीण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास पुष्पा पाटील मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद ठाणे, वैदेह विशाल वाढाण, जिल्हा परिषद पालघर, योगिता पारधीमा अध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड. संजना सावंत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे, .सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड, डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी,.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग, गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास), मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य), मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल), डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना), चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर , रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रायगड/प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रायगड.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, ठाणे, माणिक दिवे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, पालघर,श्रीमती नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रत्नागिरी राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, सिंधुदुर्ग आदि उपस्थित होते.