उद्धव ठाकरेंचा फोटो, टागोरांची कविता; तेजस ठाकरेंनी ‘अशा’ व्यक्त केल्या भावना


मुंबई: राज्यात सुरू झालेल्या सत्तासंघर्षामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर या सत्तानाट्याने निर्णायक वळण घेतले. बंडखोरी केलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापनेची तयारी केली. नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यानच्या काळात एकूण परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटोसह रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची ‘Where the mind is without fear…’ ही ‘गीतांजली’मधील प्रसिद्ध अनुवादित कविता इंस्टाग्रामवर पोस्ट केली. ‘माझ्या पित्या, स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात माझ्या देशाला जागू दे’ अशा ओळींनी शेवट होणाऱ्या या कवितेद्वारे तेजस ठाकरे यांनी आपल्या मनातील भावना नेमकेपणाने बोलकी केली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी ही भ्रष्ट आणि वाईट शक्तींपासून देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वशक्तिमान ईश्वराला केलेली एक प्रार्थना होती. (tejas thackeray has expressed his feelings)

तेजस ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र बरेच काही बोलून जाते. उद्धव ठाकरे हे विमानातून प्रवास करत आहेत. त्यांचा चेहरा धीरगंभीर आहे. विमानाच्या खिडकीतून येणारी सूर्याची किरणे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर पडली आहेत. काळाकुट्ट अंधार असला तरी देखील त्यांचा चेहरा सूर्याच्या किरणांनी झळाळून निघालेला आहे.

क्लिक करा आणि वाचा- एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंचं शुभेच्छा देणारं पहिलं ट्विट

रवींद्रनाथ टागोर यांची मूळ बंगाली भाषेत असलेली ही कविता म्हणजे भ्रष्ट, जुलमी आणि वाईट शक्तींपासून देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वशक्तिमान ईश्वराला केलेली प्रार्थना आहे. भारत ब्रिटीश राजवटीखाली असताना कविवर्य टागोर यांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी जनता स्वातंत्र्याची आतुरतेने वाट पाहत होती.

क्लिक करा आणि वाचा- शपथ घेण्यापूर्वी शिंदेंनी प्रोफाईल फोटो बदलला; शिवसैनिकांना मोलाचा संदेश दिला?

तेजस ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद –

जेथे मन निर्भय असते आणि शीर उंच असते,
जेथे ज्ञान मुक्त असते,
जेथे संकुचित झालेल्या भिंतींनी जग तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेले नसते,
जेथे सत्याच्या गर्भातून शब्द बाहेर येतात,
जेथे अथक परिश्रम पूर्णत्वाकडे हात पसरतात,
जेथे मृत सवयीच्या निर्जन वाळवंटात तर्काचा प्रवाह आपला मार्ग गमावत नाही,
जेथे मन पुढे नेले जाते
जेथे सदैव व्यापक होत जाणारे विचार आणि कृतीमध्ये मन पुढे नेले जाते
स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात, माझ्या पित्या, माझ्या देशाला जागू दे.

क्लिक करा आणि वाचा- RSS च्या संस्कारामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं, आनंदाने नाही : शरद पवार

पोस्ट केलेली इंग्रजी कविता-

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
nto the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: