रेशन तांदळाचा काळाबाजार करणारा ट्रक पोलिसांनी सोडून दिला; झाली कठोर कारवाई


अकोला : अकोल्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता लाच स्वीकारत पोलिसांनी परस्पर त्यांना सोडून दिले. हा प्रकार पोलिसांना चांगलाच महागात पडलाय. या प्रकरणी अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं आहे. या चौघांनी साडे तीन लाख रूपये घेत, हा ट्रक सोडला होता. सूत्रांच्या माहितीनुसार पकडण्यात आलेला ट्रक हा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या निकटवर्तीय व्यापाऱ्याचा असल्याचा समजते. (suspension action against four policemen)

गेल्या दीड महिन्यापूर्वी खदान पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातील चांदूर फाटा येथे एक ट्रक पकडला. या ट्रकमध्ये काळाबाजारातील रेशनचा तांदुळ असल्याचे समजते, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता परस्पर हा ट्रक आणि वाहन चालकांना सोडून देण्यात आले.

क्लिक करा आणि पाहा फोटो : काळविटाला जिवंत मारण्याच्या प्रयत्नात होती कुत्र्यांची टोळी; पोलीस मदतीला धावला अन्…

या दरम्यान, या चौघांनी ट्रक मालकाकडून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये घेण्यात आलेत. त्यानंतर प्रकरण शांत झाले. काही दिवसानंतर ट्रकचा व्यापाऱ्याने शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्याकडे धाव घेतली. अन् घडलेला सर्व प्रकार देशमुख यांच्या कानावर टाकला. लागलीच त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या बच्चू कडूंना क्लीन चिट; काय आहे प्रकरण? पाहा…

चौकशीदरम्यान या चौघांनी कारवाई न करता ट्रक सोडून दिला आणि पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले. या नंतर या चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केले. राजेश वानखडे, सदाशिव मारके, इमाम चौधरी, अमर इंगळे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मात्र आता कारवाई न करता सोडून देण्यात आलेला ट्रक आणि ट्रकमधील मुद्देमालासंदर्भात काय कारवाई केली जाणार, हे पाहणे गरजेचे आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुसळधार पावसाने नदीला पूर, ‘या’ गावांचा संपर्क तुटला; १ जूलैपर्यंत अतिवृष्टीचा इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: