जागतिक साक्षरता दिन निमित्त शैक्षणिक प्रबोधनासाठी कार्यशाळेचे आयोजन

जागतिक साक्षरता दिन निमित्त शैक्षणिक प्रबोधनासाठी कार्यशाळेचे आयोजन व शैक्षणिक साहित्यांचे वाटप Organizing workshops for educational awareness on the occasion of World Literacy Day

सोलापूर - लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने सोरेगाव येथील अशिक्षित लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजून देण्यासाठी व त्यांना प्रबोधन करण्यासाठी हॉटेल ग्रीनवुड रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

   यावेळी श्री साई कोचिंग क्लासेस या संस्थेला वह्या पेन व क्राफ्ट कीट सह इतर शैक्षणिक साहित्याचे मदत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील नेत्रतज्ञ लायन्स क्लब ऑफ सोलापूर रॉयल चे अध्यक्ष डॉ दौला ठेंगील हे होते .

अध्यक्ष लायन सौ.नंदिनी जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे व शिक्षणाबद्दल जनजागृती करणे हा आहे. 

प्रमुख पाहुणे डॉ दौला ठेंगील यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना देशातील-जगातील दारिद्र्य निर्मूलन करणे, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लिंग समानता साध्य करणे इत्यादी वाढणे खूप महत्वाचे असल्याचे सांगितले.

     सचिव अभियंता सागर पुकाळे यांनी निरंतर शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कुटुंब व समाज आणि देशाप्रती त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी व आंतरराष्ट्रीय समुदायासाठी प्रौढ शिक्षण आणि साक्षरतेच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो असे सांगितले. 

यावेळी जेष्ठ सदस्य ज्ञानेश्वर कुलकर्णी , मुकुंद जाधव, वैभव जाधव,लायन्स क्लब रॉयल चे सचिव नितीन साळुंखे आणि श्री साई कोचिंग क्लासेस चे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक लायन सौ.यशोमती जाधव यांनी केले.आभार प्रदर्शन सागर पुकाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: