पंढरपूरामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पंढरपूरामध्ये सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या In Pandharpur, a married woman committed suicide after being harassed by her

पंढरपूर / नागेश आदापुरे – अबोली अंकित मांगले या विवाहीतेला आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद संतोष बाळकृष्ण पातुरकर ,वय 55 वर्ष, धंदा व्यापार बांगडीचे दुकान, राहणार धायरी गाव, सिंहगड रोड पुणे यांची मुलगी यांनी दिली आहे.

अबोली अंकित मांगले वय वर्ष 30 हिचा विवाह 2014 साली अंकित अंजीश मांगले, वय वर्ष 37, राहणार लिंक रोड पंढरपूर यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विविध कारणावरून तिची सासू अमृता अंजीश मांगले, राहणार लींक रोड पंढरपूर, तिचा पती अंकित अंजीश मांगले, राहणार लींक रोड पंढरपूर तसेच तिची नणंद अपूर्वा रोहित भूमकर यांनी लग्नात आमच्या प्रतिष्ठेच्या मानाने मानपान केला नाही ,लग्नात कमी सोने दिले, तुझे शिक्षण कमी आहे तसेच पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत म्हणून सतत शारीरिक मानसिक त्रास देऊन मारहाण करून तिला राहत्या घरी केशवलिला बंगला, लिंकरोड पंंढरपूर येथे गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद मुलीचे वडिलांनी केली असून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 

या गुन्ह्यातील सर्वांना अटक केली असून पुढील तपास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: