पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या १७ व्या युवामहोत्सवात ‘कर्मवीर’ला सर्वसाधारण विजेतेपद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या १७ व्या युवामहोत्सवात ‘कर्मवीर’ला सर्वसाधारण विजेतेपद Punyashlok Ahilya Devi Holkar University’s 17th Youth Festival ‘Karmaveer’ general winner

  पंढरपूर -  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा '१७ वा युवा महोत्सव' दि.६ ते ८ सप्टेंबर २०२१ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या युवा महोत्सवांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करुन यशाची परंपरा कायम राखली आहे. 

      या स्पर्धांमध्ये कु.हेमा तुकाराम भोसले व समृद्धी दामोदर सावंजी या विद्यार्थी संघाने वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हेमा भोसले या विद्यार्थिनीने हिंदी वक्तृत्व स्पर्धेत तर गीता ज्ञानेश्वर जोगदंड या विद्यार्थिनीने सुगम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.  प्रसाद ज्ञानेश्वर बेलकर या विद्यार्थ्यांने शास्त्रीय तालवाद्य तर गीता ज्ञानेश्वर जोगदंड यांनी शास्त्रीय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

 युवा महोत्सवातील या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,सचिव प्रिन्सिपल डॉ.विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिन्सिपल डॉ.प्रतिभा गायकवाड, पश्चिम विभागीय चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख संजीव पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. युवा महोत्सव स्पर्धेतील विद्यार्थ्यांना डॉ. प्रशांत नलवडे, डॉ.दत्तात्रेय डांगे, डॉ.रमेश शिंदे व प्रा.धनंजय वाघदरे यांनी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेंद्र मोरे,गणेश वायाळ, विशाल बडके, विजय वाघमारे व राधा जोगदंड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: