महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या आंदोलनाला यश, गणपती सणापूर्वी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वेतन अदा Success to the agitation of Maharashtra State Municipal Council Employees Coordinating Committee
कामगार एकजूट
पंढरपूर, 09/09/2021 - महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन हे पाच तारखेच्या आत झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड व सरचिटणीस सुनील वाळूजकर यांचे मार्गदर्शनात राज्यभर आंदोलन करण्यात आले होते .यापूर्वी सर्व नगरपरिषदेचे पगार हे प्रत्येक महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेला होत होते यावर संघटनेने आवाज उठवून आयुक्त तथा संचालक नगरपालिका संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत व्हावे म्हणून व इतर मागण्यांसाठी नुकतीच मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. परंतु गणपती सण जवळ येऊन सुद्धा वेतन न झाल्याने वेतन अनुदान लवकर मिळावे म्हणून आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे विचारणा करण्यात आली. संघटनेच्या मागणीची दखल घेत आयुक्त डॉ किरण कुलकर्णी व उपायुक्त कैलास गावडे यांनी वेतन अनुदान मंजुरी पत्र पाठविले पण अनुदानाची रक्कम पाठवली नव्हती त्यामुळे काल पुन्हा आयुक्त तथा संचालक यांच्याशी फोनवर चर्चा झाली व त्यांनी लगेच संबंधित विभागाशी संपर्क साधून पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या व महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद यांच्या वेतनाची रक्कम गणपती सनापूर्वी पूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याने त्वरित रक्कम नगरपरिषद यांना अदा करावी असे आदेश दिले त्यानुसार काल सायंकाळी सहा वाजता नगरपरिषदेच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा झाली, त्यामुळे आज पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन नगरपरिषदने त्वरित त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.
गणपती पूर्वी वेतन व पेन्शन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन त्वरित अदा केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले व मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने आभार व्यक्त केले अशी माहिती सुनिल वाळूजकर राज्य जनरल सेक्रेटरी,महादेव आदापुरे अध्यक्ष, नानासाहेब वाघमारे कार्याध्यक्ष, शरद वाघमारे सहकार्याध्यक्ष यांनी दिली.