शेतकरी एकजुटीचा विजय झाला,अखेर शेतकरी जिल्हाधिकारी ,पाटबंधारे अधिकारी मूल्यांकन समितीचे अधिकारी यांच्या बैठकीचा मुहूर्त ठरला

शेतकरी एकजुटीचा विजय झाला,अखेर शेतकरी जिल्हाधिकारी ,पाटबंधारे अधिकारी मूल्यांकन समितीचे अधिकारी यांच्या बैठकीचा मुहूर्त ठरला

दि २१ सप्टेंबर दुपारी २:०० वाजता सोलापूर येथे होणार बैठक

  शेळवे /संभाजी वाघुले- उजनी उजवा कालवा व डावा कालवाबाधित शेतकरी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर प्रांत कार्यालया समोर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणे आंदोलनास बसले होते,जनहितचे श्रीकांत नलावडे, महेश बिस्किटे यांनी आंदोलनाच्या बाबतीत १३ आँगस्ट रोजी निवेदन दिले होते. तुंगत,अनवली,नारायण चिंचोली, ईश्वर वाठार या डाव्याचे कालवाबधित शेतकरी व शेळवे,उपरी,खेडभाळवणी, भंडीशेगाव,कौठाळी,गादेगाव,वाडी कुरोली येथील उजव्याचे कालवाबधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडे अकरा वाजता प्रभाकर देशमुख आंदोलन स्थळी रात्री तब्बल नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहिले.उजनी पाटबंधारे डावे चे अधिकारी साबळे साहेब, कोंडकर साहेब तसेच उजवा चे अधिकारी जोशी साहेब, पंडित साहेब, मोटे साहेब, मेटकरी साहेब, यांच्याशी फोनवरून चर्चा केली व त्यांना आंदोलन स्थळी उपस्थित राहण्यास भाग पाडले. दुपारी चार वाजता प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्याशी आंदोलनकर्ते शेतकरी, सर्व अधिकारी आणि प्रभाकर देशमुख यांची प्रांत ऑफिस हॉलमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यातून ज्या शेतकऱ्यांचे अजून अवार्ड झाले नाहीत त्यांचे अवार्ड करून घेणे, ज्यांना अजून काहीच रक्कम मिळाली नाही त्यांची माहिती घेऊन त्यांचा प्रश्न नवीन अवॉर्डनुसार मार्गी लावणे, ज्यांच्या अवॉर्ड मध्ये त्रुटी आहेत, त्या तात्काळ दुरुस्त करून अशी विशिष्ट प्रकारची प्रकरणे निकालात काढणे,ज्यांचे अवॉर्ड झाले आहेत परंतु त्यांना तुटपुंज्य रक्कम मिळाली आहे त्यांची सोलापूर येथे दि २१ सप्टेंबर रोजी उजनी पाटबंधारे अधिकारी,मूल्यांकन अधिकारी, जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी , कालवाबधित शेतकरी यांच्याशी मीटिंग लावून शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन उजनी पाटबंधारे अधिकारी व प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिले आहे.

  सकाळी आकरा वाजलेपासून धरणे आंदोलनासाठी बसलेल्या सुमारे 100/150 शेतकऱ्यांनी रात्री 9 वाजता लेखी आश्वासनानंतर सुटकेचा निःश्वास घेतला, जनहित शेतकरी संघटनेप्रमाणेच आंदोलनस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक सचिन अटकळे, शहाजहान शेख,व्हिजन वार्ता चे प्रवीण नागणे सर, किरण घोडके, छावा छात्रविर चे समाधान सुरवसे, अमोल रणदिवे, अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी उपस्थित होते.

   शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न आता निकालाच्या दिशेने वाटचाल करीत असून, दि २१ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजता ची मीटिंग सर्व कॅनॉलबाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, सर्व बाधित शेतकर्यांनी मीटिंग साठी आपणास अतिशय तयारीने व पुराव्यासह उतरणे गरजेचे आहे, आता घरात बसून काही मिळणार नाही तर मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, सर्वांनी २१ तारखेच्या मिटिंगसाठी तयारीने उपस्थित राहायचं आहे -
  समाधान तुकाराम गाजरे उजनी कॅनाॅल बाधित शेतकरी,शेळवे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: