गणेशोत्सवादरम्यान अधिक जागरुक राहण्याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पुणे महानगरपालिकेत आवाहन

गणेशोत्सवादरम्यान अधिक जागरुक राहण्याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पुणे महानगरपालिकेत आवाहन Dr. Neelam Gorhe’s appeal to Pune Municipal Corporation to be more aware during Ganeshotsav

पुणे :- गणेशोत्सवचे देखावे पाहणेसाठी अनेकजण रस्त्यावर गर्दी करतात. त्यानंतर नवरात्रौत्सवाला देखिल अनेक ठिकाणी गर्दी होते. या गर्दीच्या ठिकाणी कोविड साथ रोगाच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता, महिलांच्या विरुध्द होणाऱ्या छेडछाड, दागिन्यांच्या चोऱ्या यास प्रतिबंध, गरोदर महिलांना व जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा व संरक्षण याबाबत जागृतीचा आढावा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी सर्वानी जागरूक राहून काम केले पाहिजे असे सांगितले.

  पुणे पोलीस आयुक्तालयातर्गत सर्व पोलीस ठाण्यातील सर्व महिला दक्षता समित्यांचे सदस्य, पोलीस अधिकारी,स्त्री आधार केंद्राचे पदाधिकारी यांची दृकक्षाव्य बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने स्त्री अत्याचार प्रतिबंधावर विविध महिला दक्षता समिती सदस्यांनी आपली भूमिका मांडली व महिला दक्षता समित्यांचे कामकाज अधिक प्रभाविपणे करण्याबाबत खुली चर्चांमध्ये विविध सुचना करण्यात आल्या. 

      डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सर्व महिला दक्षता समित्यांनी अत्यंत जागरुक राहून स्त्री अत्याचार प्रतिबंधाबाबत काम करण्यासाठी सविस्तर  मार्गदर्शन केले. लक्ष्मण बोराटे उपायुक्त पुणे पोलीस, डॉ.आशिष भारती आरोग्य अधिकारी, म.न.पा. पुणे, गणेश सोनुणे जिल्हा आपत्ती अधिकारी पुणे यांनी उत्सवा दरम्यान घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. दृकक्षाव्य बैठकीचे सुत्र संचालन श्रीमती विभावरी कांबळे यांनी केले. श्रीमती जेहलम जोशी यांनी स्त्री आधार केंद्रामार्फत सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: