पाथुर्डी व मलवडी मध्ये घेतला 100 लोकांनी डोळे तपासणी शिबिराचा लाभ
करमाळा तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा

शेळवे / संभाजी वाघुले – करमाळा तालुक्यातील पाथुर्डी व मलवडी या गावांमध्ये बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने व पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य), गयाबाई बहुउद्देशीय संस्था, करमाळा व ग्रामपंचायत पाथुर्डी व मलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी मोफत डोळे तपासणी ,मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबीर आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन पाथुर्डी गावचे सरपंच प्रतिनिधी संतोष मोटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रीफळ फोडून करण्यात आले. या शिबिरामध्ये पाथुर्डी गावातील 80 लोकांनी व मलवडी गावातील 20 लोकांनी लाभ घेतला पैकी पाथुर्डी मधील 15 व मलवडी मधील 2 असे एकूण 17 लोकांना बुधरानी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे.
यावेळी पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक /अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे म्हणाले की, पाथुर्डी गावात आयोजित केलेले शिबिर हे तालुक्यातील 68 वे शिबिर असून आत्तापर्यंत करमाळा तालुक्यातील 3 हजार लोकांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत 50 लोकांना बुधरानी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे तसेच 2 हजार लोकांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व डोळ्यांची निगा राखावी असे आवाहनही ज्ञानदेव काकडे यांनी केले.
पाथुर्डी मध्ये झाले 68 वे डोळे तपासणी शिबीर संपन्न
शिबिरा वेळी पाथर्डी गाव चे सरपंच प्रतिनिधी संतोष मोटे ,रघुनाथ सावंत ,सचिन दोंड , संतोष चांगण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष धनंजय मोटे ,ग्रा.पं. सदस्य कोंडलकर व इतर ग्रामस्थ व दोंड ग्रामसेवक यांनी डोळे तपासणी साठी ग्रामपंचायत ची रुम उपलब्ध करून देऊन योग्य नियोजन केले.
यावेळी गावातील गोरगरीब आबालवृद्धांना गावात येऊन डोळे तपासणी शिबिर आयोजित करून जो लाभ दिला त्याबद्दल सरपंच प्रतिनिधी संतोष मोटे यांनी बुधरानी हॉस्पिटल पुणे व डॉ महंमद ठासरावाला, डॉ माया हजारे ,कर्मचारी तसेच गयाबाई बहुउद्देशीय संस्था करमाळा व पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन चे संस्थापक/ अध्यक्ष- ज्ञानदेव काकडे,किसनराव कांबळे- ता.अध्यक्ष-मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटना, करमाळा
संजयकुमार राजेघोरपडे-राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, संचालक राहुल रामदासी यांचे आभार मानले.