खाद्यतेलांच्या आयातीवरील करातील कपातीचा ग्राहकांना होणार का फायदा

नव्या आयात शुल्क कपातीमुळे ग्राहकांना 1,100 कोटी रुपये लाभ अपेक्षित

नवी दिल्ली ,11 SEP 2021,PIB Mumbai –
खाद्यतेलाच्या देशांतर्गत किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने विविध खाद्यतेलांच्या आयातीवरील करात कपात केली आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 10% वरून 2.5%, तर कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क 7.5% वरून 2.5% आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. रिफाईंड पाम तेल, रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क 37.5% वरून 32.5% वर आणण्यात आले आहे.मात्र या कमी केलेल्या खाद्यतेलांच्या आयातीवरील करातील कपातीचा फायदा ग्राहकांना होणार आहे का नाही हे पाहणे महत्वाचे आहे. Will consumers benefit from tax cuts on edible oil imports?

देशांतर्गत किंमती कमी करण्याच्या उद्देशाने खाद्यतेलांच्या आयातीवरील करात कपात

     आज 11 सप्टेंबर 2021 पासून शुल्कातील कपात लागू आहे.खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेषत: फेब्रुवारी 2021 पासून सरकार करत असलेल्या विविध प्रयत्नांचा हा भाग आहे.खाद्यतेलांच्या किंमती वाढत वाढत आभाळाला टेकल्या आहेत.पूरस्थिती नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन सुरू नसल्याने किंमती वाढल्याचे सांगितले जात असले तरी ही वाढ वेगाने सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला ही वाढ त्याच्या संसाराचे गणित बिघडवणारी आहे.   

खाद्यतेलांच्या आयातीवरील शुल्क कपातीमुळे या वस्तूंच्या देशांतर्गत किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ग्राहकांना वाजवी किंमतीत या वस्तू उपलब्ध होतील.

आयात शुल्क कमी करण्याबरोबरच कच्च्या पाम तेलासाठी कृषी उपकर 17.5% वरून 20% करण्यात आला आहे.खाद्यतेलांवरील आयात शुल्कात सध्या केलेली कपात संपूर्ण वर्षासाठी 1,100 कोटी रुपये आहे. सरकारद्वारे दिलेल्या शुल्काच्या अनुषंगाने पूर्वीच्या शुल्कामधील कपात धरून ग्राहकांपर्यंत 4,600 कोटी रुपयांचा लाभ पोहोचणे अपेक्षित आहे.

भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नुकतेच केलेले काही प्रयत्न खाली दिले आहेत.

कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्काचे सुसूत्रीकरण

30.06.2021 पासून कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 10% पर्यंत कमी करण्यात आले आहे.

रिफाईंड पाम तेलाची आयात सुलभ करणे

रिफाईंड पाम तेलांसाठी आयात धोरणात 30.06.2021 पासून 31.12.2021 पर्यंत “प्रतिबंधित” ऐवजी “विनामूल्य” अशी सुधारणा करण्यात आली आहे.

विविध खाद्यतेलांवरील आयात शुल्कात कपात

20.08.2021 पासून कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यावरील आयात शुल्क 7.5% आणि रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर 37.5% पर्यंत आयात शुल्क कमी करण्यात आले .

विविध बंदरांवर आयात सुविधा

सीमाशुल्क, FSSAI, PP&Q, DFPD आणि DoCA द्वारे विविध बंदरांवर आयात सुलभ केली जात आहे.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आयात मालाच्या जलद निपटाऱ्यासाठी विशेष उपाय

    कोविड -19 मुळे विलंब झालेल्या आयात मालाच्या नियमितपणे आढाव्यासाठी आणि निपटाऱ्याचा वेग वाढवण्यासाठी एक समिती काम करत आहे. यामुळे खाद्यतेलांच्या निपटाऱ्याचा सरासरी कालावधी 3 ते 4 दिवसांवर आणण्यात मदत झाली आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: