महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर Maharashtra Kalyan nidhi announces state level Darpan award

फलटण : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या 28 व्या सन 2020 च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली असून त्यातील सन्मानाचा ज्येष्ठ पत्रकार ‘दर्पण’ पुरस्कार मुंबई येथील उत्कृष्ट समाज माध्यम पत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार श्री.योगेश वसंतराव त्रिवेदी व धाडसी पत्रकार, कोविड योद्धा म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार मंगेश चिवटे (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

अन्य विभागवार जाहीर केलेले ‘दर्पण’ पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत –
1) मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर, नांदेड (आकाशवाणी प्रतिनिधी नांदेड).
2) विदर्भ विभागातून डॉ.रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै.हिंदुस्थान अमरावती).
3) पश्‍चिम महाराष्ट्रातून विनोद शिरसाट (पुणे), ज्येष्ठ समाजवादी लेखक व संपादक, हिरक महोत्सवी सा.साधना (पुणे).
4) उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलींद सदाशिव चवंडके, पत्रकार, अहमदनगर.
5) कोकण विभागातून प्रमोद कोनकर, संपादक, सा.कोकण मिडिया व प्रमुख कोकण मिडीया, समाज माध्यम रत्नागिरी.
6) मुंबई विभागातून रविंद्र तुकाराम मालुसरे, संपादक, सा.पोलादपूर अस्मिता व अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.
7) महिला विभागातून सौ.नम्रता आशिष फडणीस, विशेष प्रतिनिधी, दै.लोकमत, पुणे.
विशेष ‘दर्पण’ पुरस्कार :
1) शिवाजी पाटील, प्रतिनिधी, दै.लोकमत, मु.पो.तारळे खुर्द, ता.राधानगरी (कोल्हापूर).
2) अ‍ॅड.बाबुराव तुकाराम हिरडे, संपादक, सा.कमला भवानी संदेश, करमाळा (सोलापूर).
3) प्रा.रमेश आढाव, तालुका प्रतिनिधी, दै.तरुण भारत, फलटण (सातारा).

 यापूर्वी गेल्यावर्षी जाहीर केलेले सन 2019 चे पुरस्कार कोव्हिड-19 च्या परिस्थितीमुळे समारंभ पूर्वक देता आले नाहीत. तथापि आता सन 2019 चे व वरीलप्रमाणे जाहीर केलेले पुरस्कार कोव्हिड-19 च्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख  2,500/-, सन्मानपत्र, जांभेकरांचे चरित्र ग्रंथ, जांभेकरांचे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य यावरील माहितीपट (सी.डी.), शाल,श्रीफळ असे आहे.

सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) व कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके (सातारा) यांनी अभिनंदन  केले आहे. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: