गोफणगुंडा – वास्तवतेचा आसूड

गोफणगुंडा

सत्तेचं राजकारण हे सतत धांवत असतं
वेळ चुकली की गाडीला मुकावं लागत
ते श्वानालाही लाजवत राहतं
लाळ गळेपर्यंत तिष्ठत राहावं लागतं “!!

      वास्तवतेचा आसूड .....

आता आचार्य काय अन महात्मा काय
आम्ही सर्वानाच विसरत चाललो आहोत,
त्यांच्या प्रतिमा पुण्यतिथी जयंती
त्यांचे विचार आचार योगदान
सारे अगदी गुंडाळून ठेवत आहोत
आम्ही त्यांना पुरते विसरलोत
आता आमच्या लक्षात राहतात फक्त
घोटाळेबाज भ्रष्टाचारी दहशतवादी
सत्ताधारी नामधारी अन आम्हीही
झालोत त्यांचेच पुजारी,
जे आमच्याच मतावर आमचेच रक्त पितात
इमाल्यावर इमले चढवतात
भूखंडावर भूखंड गिळंकृत करतात
वारसदारांचे महाल उभारतात
सत्तेच्या खुर्च्या विकत घेतात
तेच आज देशसेवक तेच राष्ट्रपुरुष
तेच महात्मा तेच आचार्य
इतर सारे कवडीमोल!
त्यांचेजवळ सत्तेचे लोहचुंबक
तेच ओढवून घेतात अन
झोपवतात त्यांना हवे तसे
त्यांनाच संबोधले जाते
उद्याच्या आशा ,आमचे दैवत
आमचा अभिमान
असे बोलणारी लाचार बांडगुळांची फौज
उभी असते चौका चौकातून
त्यांचे पोवाडे गाण्यासाठी
मिळणाऱ्या बिदागीसाठी
आम्ही सारे आजही आहोत आहे तिथेच
वर्षानु वर्षे आम्हाला स्वातंत्र नाही
सुराज्यही नाही
वाट्याला येते ती फक्त अवहेलना आणि विटंबना “!!

            सुप्रभात 

“कारणाशिवाय कांहीच घडत नाही ,यांस पर्याय नाही .”!!

आनंद कोठडीया, करमाळा,
जि. सोलापूर,९४०४६९२२००

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: