महिलांवरील अत्याचार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची, राज्याने असे क्रूर प्रकार रोखावेत – अविनाश महातेकर

साकिनाका येथील महिलेवरील बलात्कार आणि हत्येच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे साकिनाका येथे आंदोलन
मुंबई दि.12/09/2021 - साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा अत्यंत अमानुष प्रकार घडला. या प्रकरणातील दोषी आरोपीना कठोरात कठोर  फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षातर्फे आज अंधेरी साकिनाका येथील सिग्नल जवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर, रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.यावेळी रिपाइं चे दादासाहेब भोसले,अंकुश हिवाळे तसेच स्थानिक जिल्हा अध्यक्ष विवेक पवार,दयाळ बहादूर ,प्रकाश जाधव, साधू कटके,रमेश गायकवाड, शशिकला जाधव,गुलाब म्हात्रे ,भारती गुरव आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
महिलांवरील अत्याचार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची, राज्याने असे क्रूर प्रकार रोखावेत – अविनाश महातेकर
  साकिनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि हत्येचा अमानुष प्रकार अत्यंत पाशवीवृत्तीचा दर्शक आहे.या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आंदोलकांच्यावतीने अविनाश महातेकर यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: