FRP च्या तीन तुकड्या विरुद्ध स्वाभिमानीचा एल्गार,फक्त एक मिस कॉल देवुन लढाईला साथ द्या

FRP च्या तीन तुकड्या विरुद्ध स्वाभिमानीचा एल्गार,फक्त एक मिस कॉल देवुन लढाईला साथ द्या – रणजित बागल Swabhimani Elgar against three FRP units, join the fight with just one miss call – Ranjit Bagal
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल

ऊसाच्या FRP चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला आहे.यामुळे भविष्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरोधात माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी raju shetti यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना swabhimani shetkari sanghatna राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि ही लढाई फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नसुन महाराष्ट्रातील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याची आहे.

या निर्णयानुसार 60% रक्कम ऊस तुटल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यात , 20% रक्कम गळीत हंगाम संपल्यावर व उर्वरती 20% रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्यांना बिल मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एक रक्कमी FRP चे कायदेशीर कवचच शासन काढून घेत आहे. आज आपण शेतकरी म्हणुन लढलो नाही तर ऊस उत्पादकांचे भविष्य अंधारात आहे. ऊस हे एकमेव भरवशाचे हमीभावाचे पीक आहे. जर FRP चे तुकडे झाले तर ऊस शेतीसुद्धा परवडणार नाही म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जागृत व्हावे व संघटित होवुन संघर्षास तयार रहावे असे बागल म्हणाले.

म्हणुन स्वाभिमानीकडुन एक अनोखी मोहीम राज्यभर राबविली जात असुन त्यानुसार ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ मिस्डकॉल मोहिम राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक संपर्क क्रमांक देखील जाहीर केला आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी (8448 183 751) या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा व या लढाईत सामिल व्हावे असे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केले आहे. या मिस्डकॉल मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: