माजी CIA अधिकाऱ्याने दिला इशारा, तालिबान-पाकिस्तानची युती भारतासाठी धोकादायक

पाकिस्तानचे नेहमीप्रमाणे भारतावर आरोप

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची उघडपणे मदत करण्यावरून अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानने जगाचे लक्ष वळवण्यासाठी भारतावर आरोप केले आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ‘स्वातंत्र्याच्या संघर्षा’ला बदनाम करण्यासाठी भारत विविध ठिकाणी दहशतवादी शिबीर चालवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसूफ आणि मानवाधिकार प्रकरणांचे मंत्री शिरीन मंजारी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भारतातवर आरोप केले. पाकिस्तानने भारताविरोधात १३१ पानांचे डोजियर प्रसिद्ध केले. भारताने गुलमर्ग, रायपूर, जोधपूर, चकराता, अनूपगड आणि बिकानेरमध्ये आयएसआयएसचे प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला.

भारताविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेणार

     पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी आरोप केला की, भारत सरकारकडून आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. याचा उद्देश्य काश्मीरमधील स्वतंत्रता आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानने म्हटले. काश्मीरमधील आंदोलनाचा संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी जोडण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पाकिस्तानने तयार केलेले डोजियर संयुक्त राष्ट्र संघात आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला देणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी म्हटले.

  जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि कायम राहणार असल्याचे भारताने याआधीदेखील पाकिस्तानला ठणकावले आहे. मात्र, पाकिस्तानकडून काश्मीर दावा सांगण्यासह भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. 
माजी CIA अधिकाऱ्याने दिला इशारा तालिबान-पाकिस्तानची युती भारतासाठी धोकादायक

पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर सध्या अफगाणिस्तानच्या मुद्यावरून वादाच्या केंद्रस्थानी आहे. अफगाणिस्तान मध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप सुरू आहे. पंजशीरमध्येही पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी हवाई हल्ले केले होते. त्यानंतर काबूल व अफगाणिस्तानच्या विविध भागामध्ये पाकिस्तानविरोधात हजारो अफगाण नागरिक रस्त्यावर उतरले होते.तालिबानींकडून वाढते अत्याचार आणि त्यासाठी पाकिस्तानकडून त्यांना मिळणारे सहकार्य यामुळे अफगाण नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: