कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय देशात ६३ वे तर महाराष्ट्रात २२ व्या क्रमांकावर
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय देशात ६३ वे तर महाराष्ट्रात २२ व्या क्रमांकावर
पंढरपूर – एज्युकेशन वर्ल्डने शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या जाहीर केलेल्या स्वायत्त महाविद्यालयाच्या रँकमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयास देशपातळीवर ६३ वा तर राज्य पातळीवर २२वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर रयत शिक्षण संस्था पातळीवर महाविद्यालयास तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रयत शिक्षण संस्थेत तिसऱ्या क्रमांकावर झेप
सदर रँकिंगसाठी कॉम्पिटन्स ऑफ फॅकल्टी, फॅकल्टी वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट, करिक्युलम अँड प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर अंड फॅसिलिटी, लीडरशिप गव्हर्नंस क्वालिटी या मुद्द्यांच्या आधारे एकूण सातशे पैकी मिळालेल्या स्कोरवरून महाविद्यालयास सदर मानांकन प्राप्त झाले आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी नवी मुंबई यास प्रथम क्रमांक, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयास द्वितीय क्रमांक तर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयास तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख संजीव पाटील, सचिव प्रिन्सिपल डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिन्सिपल डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी विशेष अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या या यशासाठी स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल, अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, महाविद्यालयाच्या कला शाखेचे उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. बजरंग शितोळे, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य व अधिष्ठाता प्राचार्य डॉ. लतिका बागल, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव व सिनिअर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.