शाश्वत विकासाचे उद्दिष्ट सद्या करताना कोरोनाच्या काळात कोणाला पाठीमागे न सोडता सोबत घेऊन जाण्याचा संकल्प – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट सद्या करताना कोरोनाच्या काळात कोणाला पाठीमागे न सोडता सोबत घेऊन जाण्याचा संकल्प उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केला…
ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिल्व्हर रॉक्सवर चाहत्यांची मोठी गर्दी.

पुणे /संभाजी वाघुले, ता.१२ ,: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती . त्याचबरोबर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. पक्षप्रमुख यांनी पक्षासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच डॉ गोऱ्हे यांनी वर्षा निवासस्थानीच्या गणेशाचे दर्शन घेतले.

ना.डॉ.गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भिक्षेकरी यांचे मोफत लसीकरण योजनेचा शुभारंभ…

आज डॉ गोऱ्हे यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्यावतीने भिक्षेकरी यांच्यासाठी मोफत लसीकरण योजनेचा शुभारंभ डॉ.गोऱ्हे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.अनेक शिवसैनिक,महिला आघाडी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी आज डॉ नीलमताईना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिष्टचिंतन केले. आज सकाळी ना. डॉ. गोऱ्हे यांच्या मातोश्री लतीकाताई गोऱ्हे यांनी त्यांचे औक्षण केले. सोबत भगिनी झेलम जोशी, मुलगी मुक्ता, भाची रोशनी यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी शाश्वत विकासाचे उद्दिष्ट सध्या करताना कोरोनाच्या काळात कोणाला पाठीमागे न सोडता सोबत घेऊन जाण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने केला.


आज ना. डॉ. गोऱ्हे यांचे पत्राद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर दूरध्वनी वरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते खा.संजय राऊत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खा.श्रीनिवास पाटील, आ.दुष्यंत चतुर्वेदी, आ.विलास पोतनीस, मुंबई मनपा महापौर किशोरी पेडणेकर, उर्मिला मातोंडकर, दुर्गा भोसले यांनी अभिनंदन केले.

प्रत्यक्ष भेट : पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, शाम देशपांडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, स्वाती ढमाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राहुल कलाटे, मीनल यादव, वैशाली मराठे, युवराज शिंगाडे, शादाब मुलाणी, उद्योजक जव्हार चोरगे, राजू विटकर, युवासेना मा. उपजिल्हाप्रमुख तुषार सोनावणे, महिला आघाडीच्या सविता मते, सुदर्शना त्रिगुणाईत, युवासेना सहसचिव शर्मिला येवले, युवासेनेचे राजेश पळसकर, कुणाल धनकवडे, छाया भोसले, संतोष गोपाळ, प्रशांत राणे, उपजिल्हाप्रमुख कुलदीप कोंडे, अमोल पंगारे, अविनाश बलकवडे, प्रवीण डोंगरे, बाळासाहेब मालुसरे, अभिनेत्री रश्मी पाटील, डॉ.अमोल देवळेकर, आकाश चतुर्वेदी, गोविंद गोळवे, संतोष गोपाळ, विलास सोनवणे, सनी गवते, ज्ञानंद कोंढरे, मुरली विलकर, राहूल जेकटे, अजय परदेशी, अनमोल परदेशी, हेमंत पवार, किरकीटवाडी सरपंच गोकुळ करांजगावने यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावागावातून मोठी गर्दी करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महिला आघाडीच्या सुनिता मोरे, अहमदनगर जिल्ह्यातून पाथर्डीचे विष्णुपंत पवार, तुळजापूर युवा सेना उपजिल्हाप्रमुख समीर कदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: