श्री समर्थ रामदास तालीम गणेशोत्सव तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम
पंढरपूर /नागेश आदापूरे,दि 15/09/2021 - श्री समर्थ रामदास तालीम गणेशोत्सव तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा करताना आवांतर खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ पत्रकार सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
यावेळी मंडळाच्यावतीने डॉ बजरंग धोत्रे,डॉ अजीत जाधव, डॉ शितल पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरज राठी,सामाजिक कार्यकर्ते रुग्णांना वृध्दांना मोफत रिक्षा सेवा देणाऱ्या विष्णू शेटे यांना कोवीड योद्धा पुरस्काराने ह.भ.प.मदन महाराज हरीदास यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमासाठी समर्थ रामदास तालीम तरूण मंडळाचे आधारस्तंभ सत्यविजय मोहोळकर, गणेश लिंगडे सर,अँड.उज्वल मोहोळकर, बापू कोरे समाधान आधटराव,नितीन वाडेकर,संतोष जव्हेरी,गौस करमाळकर,केदार गुंडेवार, विशाल आधटराव, विजय नवले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.