केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आजकाल प्रत्येकाच्याच समस्या आहेत,प्रत्येक जण दु:खी आहे कारण

सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणं हा राजकारणाचा मुख्य उद्देश – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी The main objective of politics is to change the lives of common man – Union Minister Nitin Gadkari

जयपूर : आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नितीन गडकरी राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाविषयी केलेलं वक्तव्याची मोठी चर्चा झाली .

  जे मुख्यमंत्री पदावर आरुढ होतात ते यासाठी चिंताग्रस्त असतात कारण केव्हा पदावरून पायउतार व्हावं लागेल माहीत नाही असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे .

नुकतंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. केंद्राच्या निर्देशामुळे विजय रुपाणी यांना पदावरून पायउतार व्हावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच नितीन गडकरींच्या या वक्तव्याने जोर धरू लागली आहे.

सध्या केवळ सत्ता हस्तगत करण्याशीच राजकारणाचा संबंध लावला जातो

आजकाल प्रत्येकाच्याच समस्या आहेत,प्रत्येक जण दु:खी आहे. आमदार दु:खी आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही, मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं मिळालेलं नाही. चांगला विभाग मिळवणारे यासाठी दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ज्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं ते यासाठी दु:खी आहेत की कधी राहणार आणि कधी जाणार याचा भरवसा देता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: