मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालघर पोलीस दलाकडुन कारवाई

मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालघर पोलीस दलाकडुन कारवाई Palghar police force cracks down on violators

पालघर – पालघर जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमांवर पालघर पोलीस दलाकडुन कारवाई केली. संपुर्ण महाराष्ट्रात कोव्हीड -१९ चा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे .राज्यभरात कोव्हीड -१ ९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने दिनांक ०५/०४/२०२१ रोजी मनाई आदेश लागु केले होते . तसेच दिनांक १४/०४/२०२१ रोजी सायंकाळी ०८.०० वा.ते दिनांक ०१/०५/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा.पावेतो मनाई आदेश निबंधासह जाहीर करण्यात आला आहे . सदर निबंधाचे पालघर जिल्हयामध्ये पालन करणे कामी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे ,पालघर ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड,पालघर यांनी सदर आदेशान्वये कारवाई करण्याबाबत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सविस्तर सुचना दिल्या . सदर सुचनांचे पालन पालघर जिल्हयामध्ये अत्यंत प्रभाविपणे करण्यात येत आहे . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये वळणचौकी ,चाररस्ता , आंबेडकर चौक ,हातनदी नाका, माकुंसार , पामटेंभी,माहिम,पाम ,पारगाव,गेरुचाहोळ , सरावली ,एमआयडीसी नाका ,खैरेफाटक , खडखडा ब्रिज , बायपास ,सागर नाका,झाई , वेवजी ,तलासरी नाका ,डहाणु नाका, सायवन ओपी , चारोटी , खांडेश्वरी नाका , कुडुस नाका , पाटिलपाडा नाका , मोखाडा चौफुली इत्यादी २६ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावली आहे . तसेच बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बसस्टॅड,रहीवा दीच्या बंदोबस्त लावण्यात आला आहे व मनाई आदेशाचे उल्लघन होणार नाही याची काळजी अत्यंत परिणामकारकपणे पालघर पोलीस दलाकडुन घेण्यात येत आहे .
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक ,पोलीस उपअधिक्षक गृह , सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी यांचेसह १६ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी , इतर पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदारांनी अंत्यत प्रभावीपणे कामगिरी करुन मनाई आदेशाचे उल्लघन करणाऱ्या व्यक्ती ,संस्था आणि संघटना इत्यादीवर कारवाई करण्यात आली आहे. दिनांक ०५/०४/२०२१ रोजी ते दिनांक २७/०४/२०२१ रोजी पर्यंत मनाई आदेशाचे अनुषंगाने भादविसं कलम १८८ प्रमाणे करण्यात आलेली कारवाई पुढील प्रमाणे लग्न / हळदी हॉटेल / क्रिडा स्पर्धा बियर शॉप आदी ठिकाणी करण्यात आली .

समारंभ,रिसॉर्ट,दुकाने अशा ठिकाणी मास्क न परिधान केलेल्या २०७१ इसमांवर कारवाई पालघर पोलीस दला कडुन जिल्हाधिकारी पालघर यांचे कार्यालयीन आदेशावर कारवाई करुन दंड वसुल करण्यात आला .
पालघर पोलीस दलाकडून ४८३ ई -पास मंजूर
   पालघर जिल्हयातुन इतर जिल्हयात प्रवास करण्यासाठी दिनांक २३/०४/२०२१ पासुन दिनांक २७/०४/२०२१ रोजीपर्यंत पालघर पोलीस दला कडे एकुण १,११३ ई - पास अर्ज परवानगीसाठी प्राप्त झाले आहेत . त्यापैकी अतिआवश्यक अशा ४८३ ई - पास अर्जाना परवानगी देण्यात आली आहे.१६ अर्ज प्रलंबित आहेत. ६१४ अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत . 

 दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक ,पालघर तसेच प्रकाश गायकवाड अपर पोलीस अधीक्षक , पालघर यांच्यातर्फे जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव वाढत असुन तो रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे .अतीआवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे .अन्यथा वरीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: