राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख..

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख.. A call from Raju Shetty, two lakhs missed call came in three days.

ऊसाच्या FRP चे तीन तुकडे करण्याचा डाव साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारने आखला आहे. त्याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक अभिनव आंदोलन छेडले आहे.

   एफआरपीच्या तुकडीकरणाविरोधात एका टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देण्याचे आवाहन राजु शेट्टी यांनी केले होते . हि मोहिम दि.12 सप्टेंबर पासुन सुरू झाली असुन या मोहिमेस राज्यभरातून शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. स्वाभिमानीकडुन राज्यभर सुरू असलेल्या या अनोख्या मोहीमेत फक्त तीन दिवसांत सुमारे सव्वादोन लाख शेतकर्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देवून सहभाग नोंदवला आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी दिली आहे.

    ऊसदर अर्थात FRP च्या तुकडीकरणाच्या निर्णया विरोधात राज्यातील शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी असुन त्याचे रूपांतर हळुहळु लढ्यामध्ये होताना दिसत आहे.या निर्णयानुसार 60% रक्कम ऊस तुटल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यात , 20% रक्कम गळीत हंगाम संपल्यावर व उर्वरती 20% रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्यांना बिल मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एक रक्कमी FRP चे कायदेशीर कवचच शासन काढून घेत आहे. यामुळेच या अनोख्या मोहिमेस शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

    या लढ्यासंदर्भात राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात सर्व ऊस उत्पादक शेतकरी मोठे जनआंदोलन उभे करणार आहेत आणि येत्या काळात एक मोठा लढा यानिमित्ताने स्वाभिमानी लढेल असे बागल पुढे बोलताना म्हणाले.

दि.१२ सप्टेंबर पासुन सुरू असलेली ही मिस्डकॉल मोहिम येत्या ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी (8448 183 751) या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा व या लढाईत सामिल व्हावे असे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: